शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला

By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 14:25 IST

निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते. निवडणुका संपल्या की त्यांना विसर पडेल असं म्हणत फडणवीसांची शिवसेनेवर टीका

ठळक मुद्देशिवसेनेकडून हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच, फडणवीसांचा आरोपयापूर्वी काँग्रेसकडून करण्यात आला होता नामांतराला विरोध

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते आणि निवडणुका संपल्या की त्यांना या मुद्द्याचा विसर पडेल, असंही त्यांनी नमूद केलं. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं.यावेळी फडणवीसांनी काँग्रेसच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. काँग्रेसनं औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला विरोध केला किंवा नाही केला काय, पण शिवसेनेकडून केवळ निवडणुकांपुरता हा मुद्दा वापरण्यात येतो. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याचंही फडणवीस म्हणाले. काँग्रेसचा विरोधमहाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण अद्याप तसा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याच आधारावर तयार झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतराला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं.मनसेची मागणी शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावं यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेनं फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही पाटील यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaju Patilराजू पाटील