शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

माजी मुख्यमंत्र्याचीही आता होणार लोकायुक्तांमार्फत चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 05:36 IST

एखादी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावरून गेल्यानंतर ती लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत येणार आहे. थोडक्यात, माजी मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येतील.

मुंबई : मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा देताच, लोकायुक्त, उपलोकायुक्त कायदा दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, एखादी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावरून गेल्यानंतर ती लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत येणार आहे. थोडक्यात, माजी मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येतील.लोकायुक्त व उपलोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. विविध क्षेत्रांतील नामांकित सात सदस्यांची एक शोधसमिती स्थापन केली जाईल. ती समिती नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला करेल. मंत्रिमडळाच्या मान्यतेने आवश्यक ते फेरबदल करण्यासही मुभा देण्यात आली आहे. यासोबतच लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांच्या नेमणुकीत सर्व समावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करण्यात येणार आहे. ही दोन्ही पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद हे आतापर्यंत लोक आयुक्तांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले होते. आजच्या निर्णयानुसार हे पदही लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत आले आहे. मात्र, ते माजी मुख्यमंत्र्यांना लागू असेल. 

विधानसभेत कायदा करा: अण्णालोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली म्हणजे कायदा झाला असे नाही. या कायद्यास विधानसभेत मान्यता मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली आहे. ३० जानेवारीपासून ते राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. लोकायुक्त कशासाठी?राज्य सरकारच्या अखत्यारितील सर्व कार्यालयांशी संबंधित जनतेच्या गाºहाण्यांची आणि लाचलुचपतीच्या तक्रारींची चौकशी लोकायुक्त आणि उप लोकायुक्तांना करता येते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री