शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

वनपाल पदाची सेवाज्येष्ठता नियमानुसारच व्हावी; मॅटचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:34 AM

याप्रकरणी जालना येथील वृषाली बाळकृष्ण तांबे यांनी मॅटमध्ये अर्ज केला होता. वनपाल पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. २९ जणांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी गेली.

मुंबई : वनपाल पदाची सेवाज्येष्ठता ही उमेदवाराला महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळालेले गुण व त्याला प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या गुणांवरून ठरवली जावी, असा निर्वाळा महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) दिला आहे. उमेदवार प्रशिक्षणाला गेलेल्या तारखेचा आधार न घेता,  गुणांचा आधार घेऊन उमेदवाराला प्रतीक्षा यादीत स्थान द्यावे, असेही मॅटने स्पष्ट केले आहे.याप्रकरणी जालना येथील वृषाली बाळकृष्ण तांबे यांनी मॅटमध्ये अर्ज केला होता. वनपाल पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. २९ जणांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी गेली. १० सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. २८ जणांची दुसरी तुकडी त्यानंतर प्रशिक्षणासाठी गेली. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले. तांबे यांचे प्रशिक्षण दुसऱ्या तुकडीत सुरू झाले.२०१९ मध्ये त्यांच्या सेवाज्येष्ठतेची यादी तयार करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळविलेले गुण व त्याला प्रशिक्षणात मिळालेले गुण यासोबतच त्याचे प्रशिक्षण कोणत्या तारखेला सुरू झाले, याआधारे उमेदवाराला सेवाज्येष्ठतेच्या यादीत स्थान देण्यात आले. याला तांबे यांनी विरोध केला.नियमानुसार उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळविलेले गुण व त्याला प्रशिक्षणादरम्यान मिळालेले गुण हे ग्राह्य धरूनच प्रतीक्षा यादी तयार करायला हवी. या नियमाप्रमाणे माझे नाव प्रतीक्षा यादीत वरच्या स्थानात असायला हवे. त्यामुळे त्यानुसारच प्रतीक्षा यादीत मला स्थान द्यावे, अशी मागणी तांबे यांनी केली. 

‘नाव प्रतीक्षा यादीत असायलाच हवे’ सेवाज्येष्ठता ही नियमानुसारच व्हायला हवी. त्यासाठी तयार होत असलेली प्रतीक्षा यादीही नियमाला अनुसरूनच असावी. नियमानुसार उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळविलेले गुण व त्याला प्रशिक्षणादरम्यान मिळालेले गुण हे ग्राह्य धरूनच प्रतीक्षा यादी तयार व्हायला हवी. राज्य घटनेच्या आधारेच हा नियम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तांबे यांचे नाव प्रतीक्षा यादीत या नियमानुसारच असायला हवे, असे आदेश मॅटने दिले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा