मनोर: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने मनोर अधिकारी व कर्मचारी हे लोकमत जलमित्र अभियानात पाण्याचा वापर कशा पध्दतीने कमी करता येईल म्हणून आज अभियानात सहभागी झाले पाणी वाचविण्यासाठी जनजागृती करूसंपूर्ण महाराष्ट्रात तसेच ठाणे व पालघर जिल्हयात सर्वत्र यशस्वीपणे सुरू असलेल्या लोकमतच्या जलमित्र अभियानामध्ये मनोर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ही सहभागी झाले होते. मस्तान नाका येथे रविवारी आयोजित कार्यक्रमामध्ये लोकमतच्या ठाणे व पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांनी पर्यावरणाच्या व गाव, पाडयातील पाणी टंचाईच्या दृष्टीकोनातून आपल्याला पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे त्यात वनविभागाचाही महत्वाचा वाटा असेल असे स्पष्ट केले.मनोरचे वनपाल एस.पी. मांगदरे यांनी सांगितले की, आपण आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. कारण अशा तीव्र पाणीटंचाईची वेळ आपल्यावर येऊ नये. आपले बरेचसे आयुष्य भरपूर पाणी पावसात गेले. मात्र आपल्या भावी पिढ्यांवर पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये यासाठी लोकमतने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानामध्ये आम्ही सारे सहभागी होऊ व जंगलात रहाणाऱ्या आदिवासी समाजामध्येही वन विभागामार्फत जनजागृती करूआर.एन. सांगडे, के.बी.गवळे, व्ही.जी. राख, एम.मए. सुर्यवंशी, ए. जी. माने, डी.एच. भोये, एम. ए उबाळे, आर.बी. पटादे कर्मचारी सहभागी झाले होते.(वार्ताहर)
लोकमत जलमित्र अभियानात वन अधिकारी, कर्मचारी सहभागी
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST