शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यातील मदरशात परदेशी नागरिकांचे वास्तव्य; ७२८ कोटींच्या उलाढालीची ईडीमार्फत चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:50 IST

संस्थेत ७२८ कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली असल्याने हे प्रकरण ईडीकडे चौकशीसाठी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे जामीय इस्लामिया इसातूल उलुम या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या मदरशामध्ये येमेन देशातील दोन नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे समोर आल्यानंतर गृह विभागाने एटीएसच्या माध्यमातून या संस्थेची चौकशी सुरू केल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. 

या संस्थेत ७२८ कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली असल्याने हे प्रकरण ईडीकडे चौकशीसाठी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गृहविभागाने धर्मादाय आयुक्तांकडेही चौकशीसाठी हे प्रकरण दिल्याचे भोयर यांनी सांगितले.

आमदार देवेंद्र कोठे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी मांडली होती. येमेन देशातून आलेल्या व्यक्तींच्या व्हिजाची मुदत १९ फेब्रुवारी २०१६ रोजी संपूनही त्या या संस्थेच्या मदरशात राहत होत्या. त्यामुळे या मदरशाची मान्यता रद्द करण्याची मागणी कोठे यांनी केली. या संस्थेने आदिवासी समाजाच्या जमीन बळाकवल्या आहेत, तसेच शिष्यवृत्तीत घोटाळाही केल्याचा आरोप कोठे यांनी केला. याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री भोयर म्हणाले की, येमेन देशातील दोन नागरिक व्हिसा संपल्यानंतरही मदरशात राहत होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. 

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणारयेमेनच्या नागरिकांना इथे आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला कसा मिळाला? ज्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे न पडताळता हे दाखले दिले त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी केली. त्यावर उत्तर देताना, ही बाब तपासून अधिकाऱ्यांनी तसे केले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे भोयर यांनी सांगितले.

आदिवासींची जमीन बळकावल्याचा आरोपसंस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षांनाही अटक केली, मात्र नंतर त्यांना जामीन मिळाला. या संस्थेला परदेशातून मदत मिळत होती, त्यामुळे त्याबाबतची तक्रार राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. या संस्थेने आदिवासींची जमीन बळकावल्याचा, तसेच शिष्यवृत्ती घोटाळा केल्याच्या आरोपांचीही चौकशी केली जाईल.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा