शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात १८ लाखाची विदेशी दारू जप्त, राज्य उत्पादन विभागाची रेल्वे ऐजेंटच्या घरी धाड, तिघांना अटक

By सदानंद नाईक | Updated: May 31, 2025 18:45 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका तिकीट एजंटच्या घरी धाड टाकली.

सदानंद नाईक, उल्हासनगर: राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका तिकीट एजंटच्या घरी धाड टाकून राज्यात विक्रीस मनाई असलेला विदेशी स्कॉच दारूचा १८ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक झाली.

उल्हासनगर कॅम्प नं-१, येथील रेल्वे तिकिटांचा एजंट विदेशी उच्च प्रतीची स्कॉच दारूची अवैधपणे विक्री करीत असल्याची माहिती कल्याण राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. विभागाच्या पथकाने उल्हासनगर पोलिसाच्या मदतीने तिकीट एजंट अरुण पोपटानी याच्या डायमंड हॉलीडेज ऑफिसवर २८ मे रोजी धाड टाकून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉच दारूच्या बॉटल जप्त करून पोपटानीला अटक केली. कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ येथून एकूण १८ लाख ६३ हजार रुपयाची उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचचा साठा विभागाने जप्त केला. तिकिट एजंट पोपटानीसह अन्य दोन जणाला उत्पादन शुल्क पथकाने बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला. तिन्ही आरोपीला कल्याण सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

शहरांत रेल्वे व विमान तिकिटांचे व्यवहार करणारा पोपटानी चक्क दिल्ली व परराज्यातून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचची तस्करी करून हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री करीत असल्याचे तपासात उघड झाले. पोपटानी याला त्याचे साथीदार सुरज शुक्ला व दिपक नंनकानी हे मदत करीत असल्याचे उघड झाले. पोपटानीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या राहत्या घरात, इमारतीच्या पंपहाऊस आणि अंबरनाथमधील आणेगाव येथे छापे टाकण्यात आले. तसेच साथीदार सुरज श्रीकौशल शुक्ला व दिपक राजकुमार नंनकानी सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवून ठेवत होते. एकूण ३५२ स्कॉचच्या सिलबंद बाटल्या विविध ब्रॅन्ड्ससह जप्त करण्यात आल्या. तसेच दोन वाहनेही ताब्यात घेतली. 

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब त्यांच्या पथकाने कारवाई केली. तर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :raidधाडulhasnagarउल्हासनगरMaharashtraमहाराष्ट्र