शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण कंपनीतील हिस्सा विक्रीला, केंद्राला मिळणार २,८६७ कोटी रुपये; शेअर्स कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 08:17 IST

ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा ६.६ टक्क्यांनी कमी आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील ३.५% (११,७०३,५६३ शेअर्स) पर्यंतचा हिस्सा विकणार आहे. यासाठी फ्लोअर प्राईज २,४५० रूपये निश्चित करण्यात आली आहे.

ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा ६.६ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्सचे शेअर्स दोनच दिवसांत १२ टक्क्यांनी कोसळून २,५०० रुपयांवर आले आहेत. यातून सरकारला २,८६७ कोटी रुपये मिळणार आहेत.

रेग्युलेटरी फाइलिंगनुसार, ऑफर फॉर सेल किरकोळ गुंतवणूकदार नसलेल्यांना २३ मार्चला व किरकोळ गुंतवणूकदारांना २४ मार्च रोजी उघडेल. 

कंपनी काय करते ? एचएएल ही एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. तिचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. ही कंपनी जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादक कंपनी आहे. भारतीय हवाई दलाची दोन तृतीयांश वर्कहॉर्स विमाने एचएएलची आहेत. हलके लढाऊ विमान तेजसची निर्मितीही याच कंपनीने केली आहे.

२०१८ पासून निर्गुंतवणुकीची सुरुवातहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची निर्गुंतवणूक २०१८ मध्ये सुरू झाली. या वर्षी एचएएलने आपला आयपीओ जारी केला होता. यानंतर, एचएएलमधील सरकारची हिस्सेदारी १०० टक्क्यांवरून ८९.९७ टक्क्यांपर्यंत खाली आली. यातून सरकारला ४,२२९ कोटी रूपये मिळाले होते.

टॅग्स :MONEYपैसा