शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर खवय्यांची चंगळ, १८ ठिकाणी फूड काेर्ट!

By नारायण जाधव | Updated: January 15, 2025 12:19 IST

६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला हे फूड कोर्ट राहणार असून, यासाठी एमएसआरडीसीने दोन टप्प्यांत निविदा  मागविल्या होत्या.

- नारायण जाधवनवी मुंबई : समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात ‘एमएसआरडीसी’ने जागोजागी १८ फूड कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या फूड कोर्टच्या निविदांना ११ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता प्रवाशांचे ‘समृद्धी’वरील खायचे वांदे दूर होणार असून, खवय्यांची चंगळ होणार आहे. १८ पैकी तीन फूड कोर्ट ठाणे जिल्ह्यात राहणार आहेत.

६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला हे फूड कोर्ट राहणार असून, यासाठी एमएसआरडीसीने दोन टप्प्यांत निविदा  मागविल्या होत्या. गेल्यावर्षी मागविलेल्या निविदेत ॲप्को इन्फ्राटेकने कंत्राट मिळवले होते; परंतु नंतर संबंधित कंपनी हवा तो निधी उभा करू शकली नसल्याने कंत्राट रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन टप्प्यांत मागविलेल्या या निविदांना पुढील ११ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र, प्रवाशांच्या पोटाेबाची सोय झाली असली  तरी पेट्रोल पंपांचा मुद्दा मात्र अद्याप कागदावरच आहे. यामुळे वाहनांमध्ये टाकी फुल्ल करूनच समृद्धीवरून प्रवास करावा लागणार  आहे.

आमने ते इगतपुरी ४० मिनिटांतसमृद्धी महामार्गाला महामुंबईला जोडणाऱ्या इगतपुरी ते ठाण्यातील आमणे हा ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. कसारा घाटामुळे तो रखडला होता. मात्र, कसारा घाटातील बोगद्यांसह इतर सर्व कामे पूर्णत्वाकडे असून, यामुळे आमने ते इगतपुरीदरम्यानचा प्रवास ९० मिनिटांवरून ४० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.

तीन इंटरचेंजमुळे कनेक्टिव्हिटी वाढणारइगतपुरी ते कसारा सेक्शनमध्ये भारतातील सर्वांत रुंद १७.५ मीटरचा बोगदा आणि इगतपुरीमधील ८ किलोमीटरचा राज्यातील सर्वांत लांब बोगदा समाविष्ट आहे. यात ११ किलोमीटर व्यापणारे १५ व्हायाडक्टदेखील आहेत, ज्यामध्ये शहापूरमधील सर्वांत उंच व्हायाडक्ट २८ मजली इमारतीच्या बरोबरीने ८४ मीटर उंच आहे.इगतपुरी, शहापूर आणि आमने या तीन इंटरचेंजमुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे.

निविदांना प्रतिसाद दिलेल्या कंपन्या फेज : १ आनंदतारा इन्फ्रास्ट्रक्चरडीपी असोसिएट्समेहरा अँड कंपनीमिस्टिकल टेक्नोप्लास्टप्रकाश बलवंत मेंगणेशक्ती लाइफस्पेसेसएसडीएम व्हेंचर्स फेज : २ आराहा हॉस्पिटॅलिटीदीप्सिखा फ्रेश फूडराजेंद्र सुखदेव मिरगणेसिग्मा लँडकॉन एलएलपी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग