कोल्हापूर : रासायनिक खतांच्या दरात पोत्यामागे ४२५ ते ७०० रुपयांची वाढ झाली, ही वस्तुस्थिती आहे. यावर, केंद्र सरकारचे नियंत्रण असते, दरवाढीवरून राजकारण करण्याची वेळ नाही. तरीही खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती कमी करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याची माहीती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. खरिपासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून खरिपाचा आराखडा आता स्थानिक पातळीवरच कृषी ग्राम समितीच्या माध्यमातून केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.मंत्री भुसे म्हणाले, यंदा पावसाळा चांगला असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खरिपाची तयारी जोमाने केली असून स्थानिक पातळीवर पाणी, आरोग्य कमिट्याप्रमाणेच कृषी ग्रामविकास कमिटी स्थापन करून त्यांच्या माध्यमातून खरिपाचा आराखडा तयार करून तो तालुका, जिल्हा, विभाग मग राज्याकडे जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रगतशील आहे, वेगवेगळ्या प्रयोगात ते पुढे राहतात, त्यामुळे येथे चहाचे मळे, मध संकलन केंद्रे आदींना प्रोत्साहन द्यायचे असून ह्यएक गाव एक वाणह्ण ही संकल्पना रूजवण्याचा आमचा प्रयत्न आहे.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार सुजीत मिणचेकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
खतांच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा : दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 17:55 IST
DadaBhuse Minister Farmer Kolhapur- रासायनिक खतांच्या दरात पोत्यामागे ४२५ ते ७०० रुपयांची वाढ झाली, ही वस्तुस्थिती आहे. यावर, केंद्र सरकारचे नियंत्रण असते, दरवाढीवरून राजकारण करण्याची वेळ नाही. तरीही खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती कमी करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याची माहीती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. खरिपासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून खरिपाचा आराखडा आता स्थानिक पातळीवरच कृषी ग्राम समितीच्या माध्यमातून केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
खतांच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा : दादा भुसे
ठळक मुद्देखतांच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा : दादा भुसेकृषी ग्राम समिती करणार खरिपाचा आराखडा