शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

लोककलावंतांना मिळणार हक्काचे घरकुल?

By admin | Updated: April 21, 2016 01:05 IST

लावणी कलावंत, वाघ्या-मुरळी, वासुदेव, नंदीबैल, शाहीर, दशावतार, डोंबारी अशा लोककलावंतांचे हातावरचे पोट आणि उपेक्षित जीवन. तमाशा कलावंतांचीही हीच तऱ्हा.

प्रज्ञा केळकर-सिंग,  पुणेलावणी कलावंत, वाघ्या-मुरळी, वासुदेव, नंदीबैल, शाहीर, दशावतार, डोंबारी अशा लोककलावंतांचे हातावरचे पोट आणि उपेक्षित जीवन. तमाशा कलावंतांचीही हीच तऱ्हा. वर्षानुवर्षे चालत आलेला लोककलेचा वारसा जपत असताना डोक्यावर छत आणि दररोज पोटभर जेवण मिळण्याचीही भ्रांत. दुष्काळी परिस्थितीचा बसणारा फटका. अशा वेळी स्वत:चे हक्काचे घर मिळवणे हे त्यांच्या दृष्टीने स्वप्नच. पण, राज्य शासनाच्या इंदिरा आवास योजनेमध्ये ५ टक्के आरक्षणाचे आश्वासन मिळाल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार या नियमाचा अध्यादेश येत्या १५-२० दिवसांमध्ये निघण्याची शक्यता आहे. लोककलावंत वर्षानुवर्षे उपेक्षितच राहिले आहेत. दुष्काळाची परिस्थिती, घरातील दारिद्य्र यामुळे त्यांना बरेचदा आयुष्यातील मुलभूत गरजांनाही मुकावे लागते. बिऱ्हाड पाठीवर घेऊन जिथे कार्यक्रम मिळतील तेथे जायचे, लोककला सादर करायची, पुन्हा पुढचा दौरा हाच त्यांचा दिनक्रम. अशा वेळी आयुष्यात स्थैर्य मिळवता यावे, यासाठी स्वत:च्या घरकुलाचे लोककलावंतांचे स्वप्न आता सत्यात उतरू पाहत आहे. अखिल भारतीय लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेची पंकजा मुंडे यांच्यासमवेत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी इंदिरा आवास घरकूल योजनेमध्ये लोककलावंतांना ५ टक्के जागा देण्याचा निर्र्णय घेण्यात आला, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिली.> काय आहे योजना ?इंदिरा आवास घरकूल ही योजना १९९५-९६ पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागातील दारिद्य्र रेषेखालील बेघर/कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्य्र रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत लोककलावंतांना स्वत:चे घरकूल उभारण्यासाठी शासनातर्फे १ लाख रुपयांचा निधी तर तमाशा फड मालकाकडून ५० हजार रुपयांची उचल दिली जाऊ शकते. कलावंताच्या मानधनातून दर महिन्याला ही रक्कम फेडून घेता येऊ शकते. प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांच्या यादीतून इंदिरा आवास घरकूल योजनेसाठी नावे सुचवली जातील. या योजनेमुळे त्यांना हक्काचे घर मिळू शकेल, असे जाधव यांनी सांगितले.> सुपाऱ्यांमध्येही यंदा ४० टक्के घटसध्या राज्यभरात भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना सर्वच क्षेत्रांना करावा लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या लोककलावंतांना दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे. नावलौैकिक असणाऱ्या मोठे फड वगळता इतर लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा मिळणाऱ्या सुपाऱ्यांमध्ये ३०-४० टक्के घट झाली आहे. सुपाऱ्यांच्या किमतीतही घसरण झाली आहे. एक लाख रुपयांची सुपारी ६०-६५ हजार रुपयांवर आली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत कलावंतांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शासनाच्या वतीने त्यांच्यासाठी टोलमाफी, कमी दराने डिझेल अशा सवलती द्याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय लोकनाट्य तमाशा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.