शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

पाच वर्षांत उद्योग उभारल्यास विशेष सवलती, रेमंडच्या कापडनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन: देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:43 IST

नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील वस्त्रोद्योग पार्कमुळे अमरावती हे गारमेंट हब म्हणून उदयास येत आहे. औद्योगिक वसाहतीत जागेचा ताबा घेतल्यापासून पाच वर्षांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यास उद्योगांना विशेष प्रोत्साहनपर सवलती देण्यात येतील

अमरावती : नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील वस्त्रोद्योग पार्कमुळे अमरावती हे गारमेंट हब म्हणून उदयास येत आहे. औद्योगिक वसाहतीत जागेचा ताबा घेतल्यापासून पाच वर्षांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यास उद्योगांना विशेष प्रोत्साहनपर सवलती देण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. येथील रेमंड उद्योग समूहातील लिनन यार्न व कापडनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, ‘लोकमत’ समूहाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, रेमंडचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, त्यांच्या पत्नी नवाज सिंघानिया, लघुउद्योग सचिव हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते रेमंडच्या कामगार वसाहत आणि शाळेची कोनशिला ठेवण्यात आली. त्यानंतर, फीत कापून रेमंडच्या लिनन यार्न व कापडनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.‘मेक इन इंडिया’अंतर्गत वस्त्रोद्योग पार्कमधील पहिला करार रेमंड उद्योग समूहासोबत करण्यात आला. गतवर्षी झालेल्या या करारानंतर विक्रमी अल्पावधीत प्रकल्पात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली आहे.कर्मचाºयांंसाठी शाळा आणि निवास प्रकल्प साकारणे सुरू आहे. ‘फार्म, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन’ असा एकात्मिक विकास या वस्त्रोद्याग पार्कच्या माध्यमातून होतो आहे.राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी विविध २०० प्रकल्प टप्प्या-टप्प्याने सुरू होतील. यात ८ मोठ्या उद्योगांचा समावेश आहे.या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे ३० हजार रोजगार उपलब्धहोतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.प्रास्ताविक, रेमंडचे कार्पोरेट अध्यक्ष एस. के. गुप्ता यांनी केले. प्रकल्प प्रमुख एच. व्ही. राव यांनी आभार मानले.कार्यक्रमापूर्वी पाहुण्यांनी लिनन कापडनिर्मिती प्रकल्पाची पाहणी केली.अमरावतीची ओळख गारमेंट हब !अमरावती हे कोलकातानंतर देशातील महत्त्वाचे गारमेंट हब म्हणून उदयास येत आहे. औद्योगिक विकास महामंडळाने या ठिकाणी उत्कृष्ट सुविधा दिल्या आहेत. कापसाचे उत्पादनाच्या या प्रांतात कापसावर प्रक्रिया, कापडनिर्मिती आणि निर्यात या बाबी एकाच ठिकाणी होतील. त्यासाठी लगतचीच तीन हजार हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येईल. भविष्यात ड्रायपोर्ट हबदेखील साकारले जाईल.कापूस उत्पादन क्षेत्रात असे उद्योग उभे राहिल्यास, येथील अर्थव्यवस्था अधिक बळकट होर्ईल. देशात अमरावतीची ओळख गारमेंट हब अशी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रोहिराज अँड कंपनी, श्रृती टेक्सटाइल, लकी ब्रदर्स व ओम साईराम टेक्सटाइल या उद्योग प्रकल्पांचीही कोनशिला ठेवण्यात आली.राज्यात १९ हजार कोटींतून १०८ प्रकल्प - नितीन गडकरी-केंद्र सरकारच्या नाबार्डमधून राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी भागात १९ हजार कोटी रुपयांतून १०८ प्रकल्पांची निर्मिती होणार आहे. त्यातून सुमारे ७ ते ८ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा मिळेल. विदर्भातील ८४ तर अमरावती जिल्ह्यातील २४ प्रकल्प त्यात असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे दिली.नांदगाव पेठ येथील वस्त्रोद्योग पार्कमधील रेमंड उद्योग समूहातील लिनन यार्न व कापडनिर्मिती उद्योगाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री प्रवीण पोटे, ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, आ. यशोमती ठाकूर, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ. अनिल बोंडे, रेमंडचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आदी मंचावर उपस्थित होते.गडकरी म्हणाले, रेमंड उद्योगाचे उद्घाटन ही विदर्भासाठी महत्त्वाची घटना आहे. कापसावरील प्रक्रिया उद्योग विदर्भात यावे, यासाठी राज्य शासनाने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. जलसंधारण, कृषी उत्पादकता वाढविण्यासोबतच उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण केल्यामुळे विकासाची गती वाढली आहे. अमरावती येथील वस्त्रोद्योग पार्कचा होत असलेला विकास पाहून, या ठिकाणी ड्रायपोर्ट उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल.अमरावती हा संत्रा उत्पादक भाग असल्यामुळे येथे संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी पतंजली उद्योग समूहाकडून तीन हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. त्यासाठी दररोज ८०० टन संत्रा लागणार आहे. काळाची पावले ओळखून शेतकºयांनी उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस