शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या भावात पाच वर्षांचा नीचांक

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे.

औरंगाबाद : साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे. एकीकडे साखरेच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी वृद्धी झाली असताना बाजारात मागणी घटली आहे. खरेदी-विक्रीतील या विरोधाभासाने साखरेचे भाव घटले आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये साखरेचा हंगाम सुरू झाला, तेव्हा साखर एस (बारीक दाणा) २,९५० रुपये, सुपर एस (मध्यमदाणा)- ३,०५० रुपये तर एम (जाड दाणा) ३,१५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. साडेचार महिन्यांत साखर क्विंटलमागे ५५० ते ६५० रुपयांनी भाव कमी होऊन २४ मार्च २०१५ रोजी एस २,४०० रुपये, सुपर एस २,४५० रुपये, तर एम २,५०० रुपयांनी विक्री केली जात होती.राज्यात १७० कारखान्यांनी ७ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप करून ८ कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार केली. त्यापैकी औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी ६६ लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले व ६७ लाख क्विंटल साखर तयार केली. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन २५ टक्क्यांनी वाढले आहे. यासंदर्भात साखरेचे दलाल राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, जगात साखर उत्पादनात ब्राझील नंबर एकचा देश आहे. तिथे यंदा इथिनॉल तयार न करता साखर उत्पादनावरच भर देण्यात आला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गडगडले आहेत. आपल्या देशात साखरेच्या बंपर उत्पादनामुळे या मंदीत आणखी भर पडली आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कच्च्या साखरेवर सबसिडी दिली होती. यंदा पाच महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीअखेरीस सबसिडी देण्यात आली आहे. परिणामी, साखर कारखान्यांनी कच्ची साखर कमी प्रमाणात तयार केली व पक्क्या साखरेचे उत्पादन अधिक केले.साखरेचे होलसेल विक्रेते संजय लोहाडे यांनी सांगितले की, १ जानेवारी २०१० रोजी साखर ३,९०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. २४ मार्च २०१५ रोजी २,४०० तर २,५०० रुपयांनी विक्री झाली. हा भाव मागील ५ वर्षांतील साखर विक्रीतील नीचांक ठरला आहे. ४साखरेच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात उन्हाळ्यात दररोज २,५०० क्विंटल साखर विक्री होत असते. मात्र, यंदा साखरेचे भाव घटल्याने खरेदीदारांनी हात आखडता घेतला आहे. परिणामी, सध्या दैनंदिन १,६०० ते १,७०० क्विंटलच साखर विक्री होत आहे.