शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर पाच वर्षांची बंदी? कृषी विभाग आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:09 IST

...तर अन्य योजनांसाठी बंदीचा दिला राज्य सरकारला प्रस्ताव, गैरप्रकार वाढीस लागल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना

- नितीन चौधरीलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यंदाच्या मृगबहारातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत ७३ हजार ७९० अर्जांपैकी तब्बल १९ हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. खरीप पीक विमा, फळपीक विमा, कांदा पीक विमा अशा सर्वच विमा योजनेत असे प्रकार वाढीस लागल्याने कृषी विभागाने आता त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

बनावट शेतकऱ्यांना पीक विम्यासह कृषी विभागाच्या अन्य योजनांसाठी पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालावी असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला पाठविला आहे.   

तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा सूचनाही दिल्या आहेत. मृगबहारातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत कृषी विभागाला अशा बनावट अर्जांचा संशय आल्यानंतर गेले दोन महिने जिल्हास्तरावर अर्ज आणि बागांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अनेक बनावट प्रकार समोर आले आहेत. 

पडताळणीत काय आढळले? १३,९६० ठिकाणी बागांची लागवडच नाही ४,९९७ ठिकाणी प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा १५७ ठिकाणी कमी वयाच्या बागा असताना काढला विमा ५ ठिकाणी एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिक वेळा काढला विमा  

हप्ता जप्त करून सरकारकडे जमाnअर्ज अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता जप्त करून केंद्र सरकारकडे जमा केला. बनावट शेतकऱ्यांना पीक विम्यासह कृषीच्या योजनांमधून पाच वर्षांसाठी बंदी घालावी असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला बुधवारी पाठविला, असे सूत्रांनी सांगितले. nतसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या बनावट शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी