शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पाच अटकेत

By admin | Updated: June 18, 2017 03:38 IST

पवन मावळातील जोवण या गावातील १ हेक्टर ४४.१ आर जागेच्या मूळ मालकांऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून बनावट दस्ताद्वारे बोगस खरेदी-विक्रीचा प्रकार ‘लोकमत’ने

- लोकमत न्यूज नेटवर्क

लोणावळा : पवन मावळातील जोवण या गावातील १ हेक्टर ४४.१ आर जागेच्या मूळ मालकांऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून बनावट दस्ताद्वारे बोगस खरेदी-विक्रीचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जमीन गैरव्यवहारातील पाच जणांना चौकशीसाठी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली. त्यांना मदत करणारे आणखी काही साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.जमीन गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी मनीष चंद्रकांत पांडे (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, ता. मुळशी), अविनाश श्याम सुळे (वय २४, रा. भांगरवाडी, लोणावळा), मोहंमद सलीम इलियास शेख (वय ५५, रा. साईबाबा मंदिराजवळ यशवंतनगर, येरवडा), संदीप नथू शेळके (वय २५, रा. वलवण, लोणावळा), प्रमोद ज्ञानेश्वर लोहिरे (वय २१, रा. जिजामातानगर, लोणावळा) व प्रकाश कवेंदर शेट्टी (वय ३५, रा. सह्याद्री हाइट्स, भांगरवाडी, लोणावळा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.जोवणगाव येथील बाबू वाघू गोणते, आबू बाबू गोणते यांच्याकडून जमीन गट क्रमांक १७६ मधील १ हेक्टर ४४ आर जागा मुंबई (बांद्रा) येथे राहणारे महेंद्र पी. बहल व त्यांची पत्नी किरण एम. बहल यांनी १२ एप्रिल १९९०ला खरेदी केली होती. दस्तनोंदणी क्रमांक १७२३/१९९० नुसार खरेदीखताची गाव तलाठी कार्यालयाच्या दप्तरी नोंद झाली. तेव्हापासून जागेची ताबेवहिवाट बहल यांच्याकडे होती. बहल हे मुंबईत व्यवसाय करीत असल्याने त्यांना कामाच्या व्यापामुळे जागेकडे लक्ष देता आले नाही. याचा गैरफायदा घेत आरोपींनी संगनमत करून जागेचे बनावट दस्त केले. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी अविनाश सुळे याच्या घराची झडती घेतली असता, त्यांना मूळ जमिनीचे बनावट दस्त क्र. ६५३१/१६ मिळून आले. आणखी काही कागदपत्रे हाती लागण्याची शक्यता आहे. ही कागदपत्रे हाती लागल्यास या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध घेणे शक्य होणार आहे, असे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांची दलालांना साथ जमीन गैरव्यवहाराच्या या प्रकरणात आरोपींना शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी साह्य केले असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिझे यांच्या पथकाने आरोपी अविनाश सुळे याच्या लोणावळ्यातील घराची झडती घेतली असता, जमिनीचे मूळ कागदपत्र आढळून आले. आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेऊन जामिनावर सोडण्यात आले. या गैरव्यवहारात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत असून, लवकरच फरारी आरोपींनाही ताब्यात घेऊ, असे गिझे यांनी सांगितले.असा केला जमिनीचा गैरव्यवहारमुंबईतील बहल दाम्पत्याच्या जागी बोगस व्यक्ती उभ्या करून त्या जागेचे दस्त केले. दस्त क्र. ४९११/१२०१४ अन्वये वैष्णव बळीराम गायकवाड याच्या नावावर ही जागा नोंदवली गेली. ५ नोव्हेंबर २०१६ ला लोणावळ्यातील अविनाश सुळे यांनी तीच जागा इतरांच्या मदतीने वैष्णव गायकवाड हे नाव पुढे करून दस्त क्र. ६५३१/२०१६ नुसार हस्तांतरित केली. पवन मावळातील वाघेश्वर येथे राहणारे संतोष भाऊसाहेब कडू यांना या जागेची विक्री करण्यात आली. खरेदीखत दस्त क्र. १२६०/२०१७ नुसार २६ एप्रिल २०१७ ला तयार केले. त्यास सुळे यांनी मान्यता दिली. हे दस्त तयार करताना साक्षीदार म्हणून संगमेश राकेश अयप्पा (रा. लोणावळा, भांगरवाडी) व मोहम्मद शेख यांची सही घेतली. त्यानंतर एकाच भूखंडाची परस्पर अनेकदा विक्री व्यवहार झाला. याप्रकरणी बहल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.