शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 11:39 IST

परदेशी पुस्तके वाचणारा भारतीय वाचक वर्ग खूप मोठा आहे.

ठळक मुद्देवाचक ‘ इ बुक’ कडे वळण्याची शक्यतानिर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात परदेशी पुस्तकांवर 5 टक्के सीमाशुल्कपरदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क आकारल्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढणार

पुणे : परदेशी पुस्तके वाचणारा भारतीय वाचक वर्ग खूप मोठा आहे. या पुस्तकांवर 5 टक्के सीमा शुल्क आकारल्यामुळे बाहेरून येणा-या  पुस्तकांच्या किंमती वाढणार आहेत आणि वाचकांना पुस्तके खरेदी करणे न परवडल्यास ते ‘इ बुक’ कडे वळू शकतील, असे प्रकाशकांकडून सांगण्यात आले आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात परदेशी पुस्तकांवर 5 टक्के सीमाशुल्क आकारणीबाबत प्रकाशकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वाचनसंस्कृतीचा एक आढावा घेतल्यास शाळकरी मुले आणि तरूण पिढीमध्ये इंग्रजीसह विविध भाषांमधील पुस्तके वाचण्याचे प्रमाण हे अधिक आहे. या पुस्तकांना चांगली मागणी आहे. मात्र या 5 टक्के सीमाशुल्क आकारणीमुळे पुस्तकाच्या किंमती वाढणार आहेत. याचा  पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ---------------------------------------------------------------------------------------------------परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क आकारल्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढतीलच. ही पुस्तके वाचणारा एक विशिष्ठ वर्ग असला तरी वाचनसंस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने हे चित्र थोडेसे  निराशजनक आहे. पण याचा वाचनसंस्कृतीवर काही परिणाम होईल अस वाटत नाही. कारण ज्यांना या पुस्तकांची गरज वाटते ते ही पुस्तके घेणारचं. नवी पिढी ही इंग्रजी पुस्तके वाचणारी असल्याने किंडलवर ही पुस्तके ते वाचू शकतील्य- देवयानी अभ्यंकर, प्रकाशक, कॉन्टिनेंटल प्रकाशन-------------------------------------------------------------------------------------------परदेशी पुस्तकांवर सीमा शुल्क आकारल्यामुळे  पुस्तकाच्या किंमती वाढतील यात शंकाच नाही. भारतात परदेशी पुस्तके वाचणारा वाचक वर्ग मोठा आहे. पुस्तकांच्या किंमती वाढल्यामुळे वाचक मोठ्या प्रमाणावर ‘इ बुक’ कडे वळतील. परदेशी पुस्तके खरेदी करून वाचण्याकडे ओढा काहीसा कमी होईल्य- सुनील मेहता, मेहता पब्लिकेशन---------------------------------------------------------------------------------तरूण पिढीमध्ये इंग्रजी पुस्तके वाचण्याचे प्रमाण अधिक आहे. या पुस्तकांची आवड असणारी युवा पिढी नवीन पुस्तकांचा शोध घेत असते. अनेक पुस्तकांची आॅनलाईन खरेदी देखील करत असते. परदेशी पुस्तकांवर सीमा शुल्क लावल्यामुळे वाचकांना अधिक दराने पुस्तकांची खरेदी करावी लागेल. मात्र या पुस्तकांच्या किंमती न परवडल्यास पायरेटेड पुस्तक खरेदी करण्याकडे देखील कल वाढू शकेल. यामुळे बनावट पुस्तकांची नवी बाजारपेठ निर्माण होऊ शकते्य- निशांत मोरे, वाचक--------------------------------------

टॅग्स :PuneपुणेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019