विसरवाडी (जि. नंदुरबार) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव जीप उलटून झालेल्या भीषण अपघतात पाच जण जागीच ठार, तर १४ जण जखमी झाले. ही घटना नंदुरबार-नवापूर रस्त्यावरील लहान कडवान गावाजवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.अंकुश वसावे (३१,चालक), रामा वसावे (२२), गावजी वसावे (५०), जालमसिंग वसावे (५०) व विकेश वसावे (१९) अशी मृतांची नावे आहेत. खातगाव येथील ग्रामस्थ जीपमधून लहान कडवान येथे सोंगाड्या पार्टी पाहण्यासाठी जात होते. जीप लहान कडवान गावाजवळ आल्यानंतर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव जीप उलटली. तीन-चार पलट्या मारल्याने जीपखाली दाबल्या गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये १४ जण जखमी झाले असून, त्यांंना विसरवाडी व खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)
नंदुरबारमध्ये जीप उलटून पाच ठार
By admin | Updated: March 4, 2015 02:03 IST