शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने घेतले पाच बळी; नगर, नाशिक, लातूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:12 IST

पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबई : राज्यभरात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर, नाशिक आणि लातूर जिल्ह्यांत वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर विद्युतखांब व ताराही तुटल्या. पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरीतील खेड परिसरात मुसळधार पाऊस बरसला. रायगडमधील पाेलादपूर, माणगाव, महाड, म्हसळा या तालुक्यांतील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात उसाच्या शेतात खत टाकत असताना वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे वीज अंगावर पडून महिलेसह चार शेळ्या ठार झाल्या. नगर जिल्ह्यात पारनेर, श्रीगोंदा, जामखेडमध्ये पाऊस झाला.मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लातूरमध्ये झाडाखाली थांबलेल्या आजी व नातीचा वीज पडून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ५० पेक्षा जास्त घरावरील पत्रे उडाले. विद्युतखांब व ताराही तुटल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगासह परिसरात दीड तास जोरदार पाऊस झाला.विदर्भाला झोडपलेविदर्भातील वाशिम, बुलडाणा, नागपूर, वर्धा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. वाशिममध्ये वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडण्यासह झाडे उन्मळून पडली. बुलडाणा जिल्ह्यात चिखली, बुलडाणा तालुक्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.