शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राव शैक्षणिक संस्थेच्या पाच महाविद्यालयांना परवानगी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 02:05 IST

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राव शैक्षणिक संस्थेच्या ठाणे व नवी मुंबईतील पाच कनिष्ठ महाविद्यालयांना अंतिम परवानगी देऊ नका, असा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी शालेय शिक्षण विभागाला दिला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राव ट्रस्टला दिलेल्या तात्पुरत्या निर्देशांक क्रमांकावर काम करण्यासही उच्च न्यायालयाने शालेय शिक्षण विभागास मनाई केली.कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राव शैक्षणिक संस्थेला शैक्षणिक वर्ष २०२१-२२ इतकी मुदतवाढ देण्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या १८ डिसेंबर २०२० च्या निर्णयाला निवासी आणि शैक्षणिक ट्रस्टच्या ट्रस्टी मंजू जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. वर्षा गायकवाड यांनी या संस्थेला निर्देश क्रमांक देण्याचे आदेश दिले. तसेच या संस्थेतील  बारावीच्या ६७२ विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेचे फॉर्मही भरण्याची परवानगी दिली. त्यानुसार, या संस्थेच्या अंधेरी, बोरिवली, सायन, नवी मुंबईतील खारघर आणि ठाणे येथील पाच कनिष्ठ महाविद्यालयांना तात्पुरता निर्देशांक क्रमांक देण्यात आला. जयस्वाल यांनी यावर आक्षेप घेत या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी न्यायलयाकडे केली. कायद्यानुसार शिक्षण मंत्र्यांना असे आदेश देण्याचे अधिकार नाहीत, असा युक्तिवाद जयस्वाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी केला. शिक्षण मंत्र्यांनी दिलेले हे आदेश उच्च न्यायालयाने जयस्वाल यांच्या मूळ याचिकेत २८ जानेवारी २०२० रोजी दिलेल्या आदेशाशी विसंगत आहेत. न्यायालयाने राज्य सरकारला नवीन कनिष्ठ महाविद्यालय किंवा नवी तुकडी वाढवण्यासंदर्भात केलेल्या अर्जावरही विचार करू नका, असे आदेश दिले होते.

 नव्या महाविद्यालयांनाही परवानगी नाही n अनेक कोचिंग क्लासेसना कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी कायद्यानुसार बंधनकारक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध न करताच परवानगी देण्यात येत असल्याची तक्रार जयस्वाल यांनी याचिकेद्वारे केली आहे. अशाप्रकारे तडजोड करून देण्यात आलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या परवानग्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे. n राज्य सरकारकडे कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी असलेली यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नसल्याने उच्च न्यायालयाने जानेवारी २०२० मध्ये राज्य सरकारला नव्या महाविद्यालयांना व नवीन तुकडी सुरू करण्यास परवानगी देण्यासाठी मनाई केली होती.