शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट रस्त्यांमध्ये राज्यातील पाच शहरांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:45 IST

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शहरांना विविध उपक्रम आयोजित करण्यास सांगितले. ‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ हा उपक्रमदेखील त्याचाच एक भाग आहे.

मुजीब देवणीकरलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने स्मार्ट शहरांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आयोजित केलेल्या ‘स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज’ या स्पर्धेत राज्यातील पाच शहरांनी बाजी मारली आहे. औरंगाबादसह नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील ११३ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पहिल्या ३० प्रमुख शहरांची घोषणा मंगळवारी केंद्र शासनाने केली.

महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबाद शहराने या उपक्रमात सहभाग घेतला. क्रांती चौकातील झाशी राणी पुतळ्यासमोरील रस्त्यावर या उपक्रमाचे आयोजन केले.यात स्टेज एकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पहिल्या ३० शहरांची यादी जाहीर केली. यात औरंगाबादचा समावेश आहे. पहिल्या ३० शहरांच्या यादीत औरंगाबादसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक व नागपूरचा समावेश आहे. इतर राज्यांतील अमृतसर, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुरुग्राम, हुबळी धारवाड, इंफाळ, इंदूर, जबलपूर, झाशी, यासह इतर शहरांचा समावेश आहे.

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शहरांना विविध उपक्रम आयोजित करण्यास सांगितले. ‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ हा उपक्रमदेखील त्याचाच एक भाग आहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वसामान्यांना पायी फिरता यावे, बाजारपेठेत कोणत्याही वाहनाविना मुक्तपणे खरेदी करता यावे, तो परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे, वयोवृद्ध नागरिकांसाठी ई-वाहनांची सोय, रस्त्याच्या कडेला आरामशीर बसता यावे, अशा सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.

चार रस्तेक्रांती चौक ते गोपाल कल्चरल हॉल, गुलमंडी ते पैठणगेट, कॅनॉट प्लेस, एमजीएम प्रियदर्शनी उद्यान रोड स्ट्रीट्स फॉर पिपल उपक्रमासाठी निवडण्यात आले आहेत. क्रांती चौक येथे तसा रस्ताही तयार केला आहे. कॅनॉट प्लेसमध्ये काम सुरू करण्यात आले.