शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी फिटनेसची तपासणी, मगच ‘भारत जोडो’त पदयात्री; केवळ १२० जणांची निवड, मराठवाड्यातून एकमेव श्रावण रॅपनवाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 07:49 IST

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेत त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी अतिशय अवघड अशा तपासण्या करण्यात आल्या.

देगलूर (जि. नांदेड) :

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेत त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी अतिशय अवघड अशा तपासण्या करण्यात आल्या. पाच महिने चालणाऱ्या या संपूर्ण पदयात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातून २ हजार जण दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, शारीरिक तपासणी, चालण्याची सवय या बाबींबरोबरच इतर कोणत्याही व्याधी नसलेल्या केवळ १२० जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये मराठवाड्यातून नांदेडचे डाॅ. श्रावण रॅपनवाड हे एकमेव ठरले आहेत.  

ही निवड करताना कौटुंबिक पार्श्वभूमीसह फिटनेस, रक्तदाब, मधुमेह यासह इतर आजार या बाबींची दिल्लीत तपासणी करण्यात आली. त्यानंतर मुलाखत घेण्यात आली. जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांच्या दिल्लीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यात मराठवाड्यातून श्रावण रॅपनवाड हे एकमेव कार्यकर्ते निवडले आहेत.

पदयात्रेत सांगलीच्या डॉक्टरांची टीम पदयात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूंच्या आरोग्याविषयी काही समस्या निर्माण झालीच तर त्याच ठिकाणी उपचार करता यावेत. याव्यतिरिक्त पदयात्रींचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने डॉक्टरांचे एक पथक आणि रुग्णवाहिकाही पदयात्रेत सज्ज आहेत. युवक काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाकडून या विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या यात्रेत सज्ज ठेवले आहे. सांगली येथून १० डॉक्टरांची टीमही सहभागी झाली आहे. 

‘भारत जोडो’त राज्यातील नऊ जणांचा समावेशभारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव नांदेडचे श्रावण रॅपनवाड यांच्यासह रोहन लाल बिट्टू, मनिंदर सिंग वोरा, वैष्णवी भारद्वाज, नंदा म्हात्रे, आतिशा पैठणकर, सत्यम ठाकूर, मनोज कुमार उपाध्याय आणि पिंकी राजकुमार सिंग यांची भारत यात्री म्हणून निवड झाली आहे.

अशी आहे राहुल गांधी यांची दिनचर्या   खासदार राहुल गांधी आणि यात्रेतील सहभागी सर्वांची दिनचर्या ही पहाटे साडेचार वाजता सुरू होते. साडेपाच वाजता ध्वजवंदन झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. सकाळच्या सत्रात चालल्यानंतर दुपारच्या सत्रात विश्रांती असते. यावेळी राहुल गांधी हे बुद्धिवादी लोकांशी संवाद साधतात. विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरू होते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी ६ डॉक्टरांचे पथक आणि दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी