शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुवरील ओळखीतून विदेशी महिलेचा नाशिकच्या व्यवसायिकास ४१ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 17:44 IST

नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिलेने ही रक्कम स्वत:च्या तसेच वेळोवेळी वेगवेगळे बँक खाते क्रमांक देऊन त्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते़ या प्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विदेशी महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे नॅस्ट्रोजेन सीडस् : विदेशी डॉक्टर महिला इलेक्ट्रिक व्यवसायिकास गंडा : गुन्हा दाखल

नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिलेने ही रक्कम स्वत:च्या तसेच वेळोवेळी वेगवेगळे बँक खाते क्रमांक देऊन त्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते़ या प्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विदेशी महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील सुयश टेरेस अपार्टमेंटमधील रहिवासी प्रमोद पांडूरंग मोरे (४७) यांचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय असून त्यांनी इंडिया मार्ट या साईटवर नोंदणी केली आहे़ युनायटेड किंग्जडम येथील संशयित डॉ़ख्रिस्ती जून्स या महिलेने जून २०१७ ते आतापर्यंत +४४७५३४९९३८५४ व ४४७५५४९६३२८९ या क्रमांकावरून मोरे यांना फोन केला व केंट फार्मास्युटीकल्स (यूक़े़)कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नॅस्ट्रोजेन सीड्स या बियांची मागणी केली़ मात्र, याबाबत माहिती नसल्याने त्यांनी या महिलेकडे विचारणा केली असता तिने दिल्लीतील प्रियंका शर्मा या महिलेचा मोबाईल नंबर दिला़प्रियंका शर्मा या महिलेच्या मोबाईलवर ०८३७५८७६९४९ संपर्क केल्यानंतर तिने दिल्लीतील ग्लोबल एंटरप्रायजेसमधून बोलत असल्याचे सांगितले़ यानंतर बियांची पाकिटे खरेदी करण्यासाठी १ लाख २८ हजार रुपये दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्रमांक ०७२००५००१५७७ मध्ये भरण्यास सांगून नॅस्ट्रोजेन सीड्स या बियांच्या व्यापाराची व बियांची माहिती देऊन विश्वास संपादन केला. यानंतर मोरे यांनी आपल्या पिंपळगाव बसवंत येथील खासगी बँकेतील खाते क्रमांक ०७०१२१२००००३८५ वरून आरटीजीएस केली़संशयित डॉ़ख्रिस्ती ज्यून्स हिने मोरे यांना आपल्या मॉरिस मूर नावाच्या कंपनीतून बायहॅण्ड पर्चेस आॅर्डर देतो असे सांगितले़ त्यानुसार मुंबईतील गोरेगाव स्टेशन येथून त्यांना मिळालेल्या आॅर्डरमध्ये बियांची आणखी २० पाकिटे घेण्यास सांगण्यात आले व वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले़ त्यानुसार मोरे यांनी जून २०१७ ते आजपर्यंत वेगवेगळ्या बँक खात्यावर ४१ लाख ६४ हजार ५९५ रुपये भरले आहेत़ परदेशी डॉक्टर महिलेने विश्वास संपादन करून बियांच्या व्यापाराच्या नावाखाली फसवणूक केल्याचे लक्षात येताच मोरे यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़

टॅग्स :NashikनाशिकFacebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम