शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘एक मच्छिमार, एक मासा’

By admin | Updated: October 24, 2015 00:39 IST

अभिनव उपक्रम : निधीचे होणार संकलन, पहिल्याच दिवशी तीन हजाराचा निधी

मालवण : पर्ससीन नेट आणि परराज्यातील हायस्पीड मासेमारीचे अतिक्रमण, पर्ससीन विरोधी न्यायालीन लढा, आंदोलने असा संघर्ष करत जणू अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छिमारांनी ‘एक मच्छिमार एक मासा’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. मच्छिमारांच्या जाळीत सापडलेल्या मासळी पैकी एक मासा बाजूला काढत जमा झालेल्या मासळीची घाऊक विक्री करून निधी उभारला जाणार आहे. जमा झालेला निधी पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्यासाठी तसेच मच्छिमार समाजातील सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरात येणार आहे. मच्छिमार नेते तथा नॅशनल फिश वर्कर फोरमचे सदस्य रविकिरण तोरस्कर म्हणाले, गेली अनेक वर्ष विचाराधीन असलेली ही संकल्पना दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रत्यक्षात उतरली आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर रापण, गिलनेट, न्हय, ट्रोलिंग आदी प्रकारची मासेमारी गेली अनेक वर्ष सुरु असून ३० ते ३५ हजार कुटुंबे यावर आपली उपजीविका करत आहेत. शासनानेही प्रत्येक प्रकारच्या मासेमारीसाठी समुद्री क्षेत्र ठरवून दिले आहे. असे असताना गेली काही वर्ष अनधिकृत यांत्रिक पर्ससिन, हायस्पीड या सारख्या परराज्यातील औद्योगिक नौकांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासळीची लयलूट सुरु केली आहे. यात मत्स्यविभाग व मत्स्यखाते कमी पडत आहे. तर मच्छिमारांचा सविनय लढाही कमी पडतो आहे. यात न्यायासाठी संघर्ष लढा देणारा पारंपरिक मच्छिमार आर्थिक बाजूने कमी पडत आहे. त्यामुळे ‘एक मच्छिमार एक मासा’ ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. मच्छिमार, महिला, व्यापारी व एजंट आदींनी यास सहमती दिली आहे. दरदिवशी हा उपक्रम सुरु राहणार असून यात कोणत्याही स्वरूपाचे बंधन असणार नाही असेही सांगण्यात आले. देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर अश्या प्रकारची संकल्पना राबवली जात आहे. सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातून या संकल्पनेस आज सुरवात झाली. मालवण मासळी मार्केटजवळ मासे लिलावाच्या ठिकाणी आज पहिल्याच दिवशी जमा झालेल्या मासळीच्या लिलावातून २ हजार ८०० रुपये निधी गोळा झाले. यावेळी जेष्ठ मच्छिमार नेते रमेश धुरी, विकी तोरस्कर, दिलीप घारे, रुपेश प्रभू, मिथुन मालंडकर, वीरेश लोणे, अना लोने, भाऊ मोर्जे, सन्मेश परब आदी मच्छिमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)