शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

राज्यात पहिल्यांदाच असे घडले! आरटीओ कार्यालय सकाळी साडे सात वाजता उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 20:37 IST

पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी चक्क सकाळी ७.३० वाजताच कार्यालय उघडून शिकाऊ परवान्यांसाठी चाचणी घेतली.

ठळक मुद्देदिवसभरात प्रत्येक तासाला १०० याप्रमाणे ७०० जणांची चाचणी घेतली जाणार आहे.

पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसारच कर्मचारी व नागरिकांना बोलविले जात आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. पण दुसरीकडे पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी चक्क सकाळी ७.३० वाजताच कार्यालय उघडून शिकाऊ परवान्यांसाठी चाचणी घेण्यास सोमवार (दि. २१) पासून सुरूवात केली आहे. सकाळी ७.३० वाजता शिकाऊ चाचणीला सुरूवात होणे, असे राज्यात पहिल्यांदाच घडले आहे.राज्यातील परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ पक्का परवान्याच्या चाचणीसाठीचा कोटा वाढविण्याच्या सुचना परिवहन आयुक्तांनी दिल्या होत्या. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर कोटा वाढविल्यास संसर्गाचा धोका अधिक होता. त्यातच पुण्यामध्ये बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे आरटीओ अजित शिंदे यांनी चाचणीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी सकाळी १०.३० वाजल्यापासून कार्यालयामध्ये शिकाऊ चाचणीला सुरूवात होत होती. पण ही वेळ सोमवारपासून सकाळी ७.३० करण्यात आली आहे. दिवसभरात प्रत्येक तासाला १०० याप्रमाणे ७०० जणांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे चाचणीसाठीचे वेटिंग १ ते २ दिवसांवर आले आहे.एका दिवसांत ७०० जणांच्या चाचण्या घेणारे पुणे कार्यालय पहिले ठरणार आहे. तसेच सकाळी साडे-सात वाजता कार्यालय उघडून अनोखे उदाहरण पुढे ठेवल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या हस्ते फीत कापून या बदलाची सुरूवात झाली. यावेळी चाचणीच्या ठिकाणी फुलांची सजावट करून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. सकाळी ७.३५ वाजता पहिल्या उमेदवाराला शिकाऊ परवाना देण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहायक मोटार निरीक्षक प्रदीप ननावरे, गणेश विघ्ने, राजकुमार चोरमारे, रविंद्र राठोड, मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनचे अध्यक्ष राजु घाटोळे आदी उपस्थित होते.------------कोटा वाढविण्यात आल्याने सुरक्षित अंतराचा प्रश्न निर्माण होणार होता. त्यासाठी कोटा कमी न करता वेळेत बदल करण्यात आला. या बदलामुळे दररोज ७०० जणांची चाचणी घेणे शक्य होणार आहे. विद्यार्थी, नोकरदार तसेच ज्यांना कार्यालयीन वेळेत येता येणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही वेळ सोयीची असेल. या बदलामुळे पुर्वनियोजित वेळेसाठी वाट पाहावी लागणार नाही आणि गर्दीही टाळता येणार आहे. बहुधा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे.- अजित असेशिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसcorona virusकोरोना वायरस बातम्या