रत्नागिरी : शासकीय रेखाकला परीक्षेत येथील फाटक हायस्कूलच्या शुभमङ्कसंतोष भेलेकर याने राज्यात प्रथमङ्कक्रमांक पटकावला. आज सकाळी हा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र कला संचालनालयाचे उपमुख्य समालोचक नंदकुमार साळवी यांनी गुरुवारी दुपारी शाळेत शुभमचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक आनंदा ङ्कमोरबाळे, कलाशिक्षक, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दाक्षायिणी बोपर्डीकर उपस्थित होत्या.शुभम आठवीत शिकत असून, त्याला रामचंद्र रघुनाथ ओटुरकर स्मृृती पारितोषिक, स्वप्नील ङ्कमोरे पारितोषिक आणि कॅमल आर्ट ही पारितोषिकेही मिळाली आहेत. त्याला कलाशिक्षक दिलीप भातडे, नीलेश पावसकर व बहिण श्रुती यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्याला हा प्रथमच सन्मान मिळाला आहे. शुभमने स्टील लाईफ, नेचर ड्रॉर्इंग, कलरींगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून मेमरी प्रकारात नववा व डिझाईन प्रकारात राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. यापूर्वी शुभमने कॅमलची राष्ट्रीय स्पर्धा, टपाल विभागाची स्टँप डिझाईन स्पर्धा, सामाजिक वनीकरणच्या स्पर्धांमध्येही यश मिळवले आहे. शुभमचे वडील फाटक हायस्कूलमध्ये शिक्षक असून, आई अभ्यंकर बालकङ्कमंदिरात शिक्षिका आहे. भविष्यात कलाक्षेत्रातच करिअर करण्याचा शुभमचा मानस आहे.फाटक हायस्कूलमधील केतकी राणे हिनेही रेखाकला परीक्षेच्या गुणवत्ता यादीत २०वा क्रमांक मिळवला. इंटरमिजिएट परीक्षेसाठी फाटक हायस्कूलमधून २५ विद्यार्थी बसले होते. २० जणांना ‘अ’ श्रेणी मिळाली. एलिमेंटरी परीक्षेसाठी ४३ पैकी २३ जणांना ‘अ’ श्रेणी मिळाली. या यशाबद्दल ङ्कमुख्याध्यापक आनंदा ङ्कमोरबाळे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष वसंत जोशी यांनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)शासकीय रेखाकला परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यला पहिल्यांदाच यश.भविष्यात कलाक्षेत्रातच करिअर करण्याचा मानस.फाटक हायस्कूलमधील २५पैकी २० विद्यार्थ्यांना मिळाली अ श्रेणी.एलिमेंटरची परीक्षेसाठी प्रविष्ठ ४३पैकी २३ जणांना प्रथम श्रेणी.
रेखाकला परीक्षेत शुभम राज्यात प्रथम
By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST