शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

Oxygen Express: ऑक्सिजन एक्स्प्रेस आज राज्यात दाखल होणार; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 12:22 IST

Oxygen Express: कोरोना संकटात महाराष्ट्राला मोठा दिलासा; ऑक्सिजनचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरश: धावाधाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. विशाखापट्टणमहून निघालेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस आज राज्यात पोहोचेल. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला मोठं बळ मिळेल.विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणण्यासाठी कळंबोलीहून एक रेल्वे रवाना झाली होती. या रेल्वेनं परतीचा प्रवास सुरू केला आहे. आज रात्री ती नागपूरला पोहोचेल आणि उद्या सकाळी नाशिकला येईल, अशी माहिती परिवहन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. विशाखापट्टणमहून महाराष्ट्राला रवाना झालेली ही पहिलीच ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे.

एका एक्स्प्रेसमधून किती ऑक्सिजन मिळणार? दुसऱ्या लाटेत कोरोनाचा अधिकच उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय, कोरोना लसी, रेमडेसिवीर, बेड्सची संख्याही अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ऑक्सिजन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस काल विशाखापट्टनमला पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा 'ऑक्सिजन एक्सप्रेस'द्वारे महाराष्ट्राला करण्यात येणार आहे. 'राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लान्ट (RINL-VSP) मध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. प्लान्टमध्ये सात रिकाम्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरून महाराष्ट्राकडे रवाना करण्यात येणार आहे. सर्व टँकरमध्ये १५ ते २० टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळेस महाराष्ट्राला १०० टनाहून अधिक ऑक्सिजन मिळू शकेल, असे म्हटले जात आहे. 
ऑक्सिजन निर्मितीचे पाच युनिट कार्यरतविशाखापट्टनम स्टील प्लान्टमध्ये 'एअर सेपरेशन प्लान्ट'मध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पाच युनिट कार्यरत आहेत. यातील तीन युनिटची क्षमता ५५० टन तर दोन युनिटची क्षमता ६०० टन प्रतिदिन आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी 'एअर सेपरेशन प्लान्ट'मध्ये २६०० टन ऑक्सिजन गॅस आणि १०० टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, बोकारोहून लिक्विड ऑक्सिजन भरण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसला लखनऊहून बोकारोला पाठवण्यात येत आहे. यामुळे उत्तर प्रदेशला ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकेल. मध्य प्रदेशकडून केली जाणारी ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता इथेही ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात येईल. काही दिवसांत आणखीन अशा स्पेशल रेल्वेचे संचालन सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या