शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

‘अभिजात मराठी’ हे पहिले लक्ष्य: लक्ष्मीकांत देशमुख; संमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला विशेष मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:42 IST

महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आज वाईट आहे हे वास्तव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदान मिळेल.

शफी पठाण

नागपूर : महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आज वाईट आहे हे वास्तव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदान मिळेल. त्यातून बरेच काही चांगले उपक्रम राबवता येतील. त्यामुळे माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विशेष प्रयत्न करणार असून ‘अभिजात मराठी’ हेच माझे पहिले लक्ष्य राहणार आहे, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भावी संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. संमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला त्यांनी विशेष मुलाखत दिली. देशमुख म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेत अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने मराठी भाषेचे संशोधन व सूक्ष्म अभ्यास करून मराठी कशी अभिजात आहे, याचे पुरावे संबंधित विभागाला सादर केले आहेत. मी लवकरच प्रा. रंगनाथ पठारे यांना भेटून चर्चा करणार असून त्यानंतर दिल्लीत पाठपुरावा सुरू करणार आहे. याविषयी प्रसंगी आंदोलनाचीही माझी तयारी आहे. मराठी ही ज्ञानभाषा व व्यवहार भाषा झाली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. त्यासाठी बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणे आवश्यक आहे. यासाठीही मी संमेलनाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासनाला विनंती करणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. 

मराठी विद्यापीठ व संतपीठासाठी विशेष प्रयत्न

मराठी विद्यापीठाची मागणी जुनीच आहे. हे विद्यापीठ मराठीचे आद्यकवी मुंकुदराज स्वामींच्या अंबेजोगाई या गावी व्हावे, असाही एक मतप्रवाह आहे. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. यासोबतच पैठणला संतपीठ व्हावे, यासाठी शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. तो विषयही प्रलंबित आहे. याकडे मी संमेलनाध्यक्षाच्या पदावरून शासनाचे लक्ष वेधणार आहे. 

संमेलनासाठी एक कोटीची मागणी योग्यच

जागतिक तामीळ महोत्सवासाठी तामीळनाडू सरकारने ३०० कोटींचा खर्र्च केला. कानडी साहित्य संमेलनासाठी कर्नाटक सरकारने आठ कोटी रुपये दिल्याचे उदाहरणही ताजेच आहे. आपले राज्य सरकार मात्र खूप कद्रुपणा करीत आहे. आजच्या महागाईच्या काळात २५ लाखांच्या अनुदानात काहीच होत नाही. म्हणून साहित्य महामंडळ जी संमेलनसाठी एक कोटीची मागणी करीत आहे तिचे मी समर्थन करतो.

अध्यक्षीय भाषणासाठी ऐकणार ‘मन की बात’

माण्या अध्यक्षीय भाषणात कुठल्या-कुठल्या विषयाला स्पर्श केला जावा, मतदारांना व मराठी जणांना याबाबत काय वाटते, हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी मी लवकरच काहींना पत्र पाठवून त्यांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेणार आहे. त्या अपेक्षा, सूचनांचा अध्यक्षीय भाषणात समावेशही करणार आहे. बडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे. या शहरात होणाºया समेलनाचे अध्यक्षपद मला लाभले हे मी माझे सौभाग्य समजतो.   सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार. मी कार्यर्ता होतो, यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.