शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरोधी आघाडीचा पहिला गियर मीच टाकला- राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:19 IST

नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना अजूनही रद्द झालेली नाही.

रत्नागिरी : कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत सर्वच पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले, याचे श्रेय महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला आहे. सर्वांनी एकत्र यावे यासाठीचा पहिला गियर आपण गुढीपाडव्याच्या सभेमध्ये टाकला होता. सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन आपण केले होते. तेथूनच ही प्रक्रिया सुरू झाली, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना अजूनही रद्द झालेली नाही. मात्र शिवसेना कोकणवासियांना फसवत आहे. नाणारबाबत सेना-भाजप यांचे आतून मेतकूट जमले आहे. त्यांचा हा डाव येथील जनतेने ओळखला आहे. नाणारच काय पण कोकणात कोठेही हा प्रकल्प नको, असेते म्हणाले.कोकणसारखी सुपीक जमीन देशात कुठेच नाही. अनेक क्षेत्रात मोठे झालेले लोक कोकणातील आहेत व ते देशात आणि परदेशातही मोठ्या पदांवर काम करीत आहेत. एवढे सगळे असताना जागा विकून स्थानिक लोक काय करणार? माझा विकासाला विरोध नाही, मात्र रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पाची गरज नाही. हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्यावा, असेही ठाकरे म्हणाले.मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलतात!रिफायनरी प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. रिफायनरी कुठेही न्या, मात्र कोकणात नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलतात. प्रकल्प अन्यत्र न्यायचा असेल तर गुजरातमध्येच कशाला, अन्य कोणत्याही राज्यात नेता येईल, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा