शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे पहिले कंडक्टर झाले ९७ वर्षांचे; नगरमधून धावली होती ७३ वर्षांपूर्वी राज्यातील पहिली एसटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 07:07 IST

पहिली बस नगरहून पुण्यापर्यंत धावली आणि या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे हेही नगरचेच. आज ते ९७ वर्षांचे असून, एसटीच्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

- चंद्रकांत शेळके अहमदनगर : महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता १ जून १९४८. आज एसटीला ७३ वर्षे पूर्ण झाली. पहिली बस नगरहून पुण्यापर्यंत धावली आणि या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे हेही नगरचेच. आज ते ९७ वर्षांचे असून, एसटीच्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.  किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता. ते आज हयात नाहीत. तेही नगरचेच. या पहिल्या एसटीच्या प्रवासाबाबत सांगताना केवटे म्हणतात, माळीवाड्यातील लक्ष्मीमाता मंदिराजवळून एसटी बस सुटायच्या. तेव्हा नगरहून पुण्याचे तिकीट होतं अडीच रुपये. वाहकाचा पगार ८० रुपये असायचा, तर आठ आणे भत्ता मिळायचा. आम्ही दोघांनी १ जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता माळीवाडा स्टँडवर गाडी आणली. त्यावेळी बसची आसन क्षमता ३० प्रवाशांची होती. वाहतूक अधिकारी दादासाहेब मिरीकर यांनी गाडीची पूजा करून नारळ फोडला आणि गाडी सोडण्यात आली. त्या दिवशी २३ प्रवासी पुण्यासाठी नगरहून बसले. तर पुढे चास, कामरगाव, सुपा येथून ७ प्रवासी घेतले व गाडी फुल्ल झाली. बारा वर्षे वाहक, बारा वर्षे कंट्रोलर, १२ वर्षे निरीक्षक अशी ३६ वर्षे सेवा करून १९८४ साली मी एसटीतून निवृत्त झालो. विशेष म्हणजे आज ७३ वर्षांनंतर त्यावेळचा एकही कर्मचारी हयात नाही. एकमेव साक्षीदारकेवटे हे पहिल्या एसटीचे एकमेव साक्षीदार आहेत. त्यांना सध्या एसटीकडून निवृत्तीवेतन मिळत नाही. एसटी प्रवासाचा पास तेवढा आहे. 

टॅग्स :state transportएसटी