इथेनॉलवरील पहिली बस नागपुरात धावणार

By admin | Published: July 29, 2014 12:57 AM2014-07-29T00:57:28+5:302014-07-29T00:57:28+5:30

उपराजधानीच्या रस्त्यांवर लवकरच संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी ‘ग्रीन बस’ धावणार आहे. १०० टक्के इथेनॉलवर चालणारी सार्वजनिक परिवहन सेवेतील देशातील ही पहिली बस ठरणार आहे.

The first bus from ethanol will run in Nagpur | इथेनॉलवरील पहिली बस नागपुरात धावणार

इथेनॉलवरील पहिली बस नागपुरात धावणार

Next

ब्राझीलची कंपनी देणार : गडकरींचा पुढाकार
नागपूर : उपराजधानीच्या रस्त्यांवर लवकरच संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी ‘ग्रीन बस’ धावणार आहे. १०० टक्के इथेनॉलवर चालणारी सार्वजनिक परिवहन सेवेतील देशातील ही पहिली बस ठरणार आहे. केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारातून ही बस सर्वप्रथम सुरू करण्याचा मान नागपूर महापालिकेला मिळणार आहे. यासाठी ९ आॅगस्ट रोजीचा मुहूर्त काढण्याची तयारी सुरू आहे.
नागपूर महापालिका शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी स्टार बस चालविते. त्यासाठी वंश निमय कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे. या सर्व बस डिझेलवर चालतात. डिझेलचे दर वाढले की तिकीट वाढते व प्रवाशांवर भुर्दंड पडतो. डिझेल ६५ रुपये प्रति लिटर असून इथेनॉल ४५ रुपये लिटर पडते. त्यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चातही मोठी बचत होऊ शकते. याची दखल घेत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्राझीलच्या ‘कॅनोय’ या कंपनीशी चर्चा केली. संबंधित कंपनीने संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या चार ‘ग्रीन बस’ स्वखर्चाने देण्याची तयारी दर्शविली आहे. यातील पहिली बस नागपूर महापालिकेला मिळत आहे. इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली ग्रीन बस चालविण्याचा प्रयोग नागपुरात होणार आहे.
सोमवारी संबंंिधत बसचे पार्ट कंटेनरने नागपुरात आणले होते. संबंधित कंपनीचे काही अधिकारीही नागपुरात दाखल झाले. मंगळवारपासून बसची जोडणी सुरू केली जाईल. ९ आॅगस्ट रोजी गडकरी या ‘ग्रीन बस’ला हिरवी झेंडी दाखवतील, अशी शक्यता आहे. मात्र, संबंधित बसची कागदपत्रे पूर्णपणे तयार व्हायची आहेत. बस तयार झाल्यावर पुण्यातील एक कंपनी येऊन तिची तपासणी करेल. याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला जाईल. त्यानंतर ही बस सुरू होईल.
तीन महिने
रिझल्ट पाहू - महापौर
नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून १०० टक्के इथेनॉलवर बस चालविण्याचा पहिला प्रयोग नागपूर महापालिका करणार आहे. तीन महिने या बसचा रिझल्ट पाहिला जाईल. हा प्रयोग यशस्वी ठरला तर हळूहळू उर्वरित बसही इथेनॉलवर चालविल्या जातील. यातून महापालिकेची आर्थिक बचत होईल व नागपूर प्रवाशांनाही स्वस्तात प्रवास करायला मिळेल.

Web Title: The first bus from ethanol will run in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.