शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बँकॉक येथे पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 20:39 IST

संमेलनात जगभरातील साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, सिनेकलावंत, असे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्दे२५ व्यक्तींना यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार

पुणे : थायलंड देशात बँकॉक येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर रोजी पहिले आंबेडकरवादी विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. दिपककुमार खोब्रागडे यांची तर स्वागताध्यक्ष पदी राज्यसभेचे खासदार  अमर साबळे यांची निवड करण्यात आली आहे.या संमेलनाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश  के. जी. बाळकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, मलेशियातील जेष्ठ पत्रकार  डी. के. पंजामूर्ती यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनात इंग्लंड, मलेशिया, जपान, तायवान, सिंगापूर, म्यानमार, व थायलंड मधील जगभरातील साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, सिनेकलावंत, असे सुमारे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उत्कृष्ट साहित्यकृतींना व सामाजिक, सांस्कृतिक, वाड्मयीन चळवळीत कार्य करणाऱ्या २५ व्यक्तींना यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सुमारे १८ लेखकांच्या ग्रंथांचे प्रकाशनदेखील संमेलनात होणार आहे. तर 12 लेखकांना आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार दिले जाणार आहेत.या  दोन दिवसीय साहित्य संमेलनात आंबेडकरवादी साहित्य आणि जगातील इतर शोषितांचे प्रश्न, बौद्ध साहित्याशिवाय जगाला पर्याय नाही, आंबेडकरवादी स्त्रीवाद आणि पाश्चात्य जगातील स्त्रियांच्या वेदना आणि त्यांचे साहित्य, जागतिकीकरणाचा आंबेडकरवादी विश्व साहित्यावर पडलेला प्रभाव, आंबेडकरवादी विश्व साहित्याला आज विद्रोहाची गरज आहे काय? या विषयावर परिसंवाद होणार आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय काव्यसंमेलन व नागेश वाहुरवाघ यांच्या ‘देहदान’ या लघुचित्रपटचा शो तसेच प्रबोधन नाट्य परिषद, पुणे आयोजित   ‘मी महात्मा फुले बोलतोय’ हे  एकपात्री नाटक  कुमार आहेर  संमेलनात सादर करणार आहेत.  या विश्व साहित्य संमेलनासाठी डॉ.परा धम्ममोसी (थायलँड) , डॉ. केले हुआंग (तायवान), डॉ. पुरुषोत्तम खेडेकर (महाराष्ट्र ), डॉ. वोन पियांग (सिंगापूर), इंदर इक्बाल सिंग अटवाल (पंजाब ),गौतम चक्रवर्ती (इंग्लंड) हे प्रमुख पाहुणे आहेत.

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य