नागपुरात अपक्ष उमेदवारावर गोळीबार!

By Admin | Updated: October 1, 2014 01:48 IST2014-10-01T01:48:54+5:302014-10-01T01:48:54+5:30

निवडणूक प्रचारासाठी रस्त्याने जात असताना अपक्ष उमेदवारावर दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी देशीकट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली़

Firing on independent candidate in Nagpur! | नागपुरात अपक्ष उमेदवारावर गोळीबार!

नागपुरात अपक्ष उमेदवारावर गोळीबार!

>कोंढाळी (जि़ नागपूर) : निवडणूक प्रचारासाठी रस्त्याने जात असताना अपक्ष उमेदवारावर दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी देशीकट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली़ प्रमोद चाफले असे अपक्ष उमेदवाराचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी कोंढाळी पोलिसांत दोन अज्ञात तरुणांविरोधात भादंवि कलम 3क्7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दुसरीकडे देशीकट्टय़ातून गोळी चाललीच नसून ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याची चर्चा कोंढाळी परिसरात आहे. 
प्रमोद चाफले सकाळी 11 च्या सुमारास कोंढाळी शेकापूर मार्गाने बोलेरो जीपने जात होते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी देशीकट्टय़ातून गोळी चालविली. ती बोलेरोच्या समोरील काचाला लागून गोळीची कॅप चालकाजवळ पडली.  (वार्ताहर)

Web Title: Firing on independent candidate in Nagpur!