शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत तरूणावर गोळीबार; 24 तासातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 13:05 IST

भोसरीत विजय पांडुरंग घोलप या तरुणावर शनिवारी पहाटे गोळीबार झाला आहे.

ठळक मुद्देभोसरीत विजय पांडुरंग घोलप या तरुणावर शनिवारी पहाटे गोळीबार झाला आहे. या गोळीबारात विजय घोलप जखमी झाले आहेत. व्याजाने पैसे घेण्याच्या व्यवहारातून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे.

पिंपरी, दि. 16 - राजकीय वैमनस्यातून पिंपरीत संतोष कुरवात या गुंडावर शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना, भोसरीत विजय पांडुरंग घोलप (वय 34) या तरुणावर शनिवारी पहाटे गोळीबार झाला आहे. या गोळीबारात विजय घोलप जखमी झाले आहेत. व्याजाने पैसे घेण्याच्या व्यवहारातून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे.  या गोळीबाराची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गावलीमाथा भोसरी येथे संतोष घोलप याचं कॅन्टीन आहे. सकाळी संतोष घोलप त्यांच्या कॅन्टीनमध्ये आल्यावर ही घटना घडली. घोलप कॅन्टीनवर येताच दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. घोलप यांच्यावर दोन राऊंड फायरिंग झाली. यामध्ये घोलप जखमी झाले. गोळीबारात संतोष यांच्या हाताला गोळी लागली. तातडीने त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या चोवीस तासात गोळीबाराची घडलेली ही दुसरी घटना आहे. 

शुक्रवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी पिंपरीच्या साधू वासवाणी चौकात हॉटेलमध्ये बसलेल्या संतोष कुरावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.  ही घटना ताजी असताना भोसरी येथील गवळीमाथा येथे घोलप यांच्यावर गोळीबार झाला आहे.