मुंबईत वायुदलाच्या तळावर गोळीबार, २ ठार

By Admin | Updated: May 27, 2014 14:17 IST2014-05-27T10:48:30+5:302014-05-27T14:17:35+5:30

मुंबईतील सांताक्रूझ येथील वायुदलाच्या तळावर दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Firing in the air base in Mumbai, 2 killed | मुंबईत वायुदलाच्या तळावर गोळीबार, २ ठार

मुंबईत वायुदलाच्या तळावर गोळीबार, २ ठार

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २७ - मुंबईतील सांताक्रूझ येथील वायुदलाच्या तळावर दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वायुदलाच्या तळावरच कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार तर इतर दोघे झकमी झाले आहेत. आर. एस. यादव असे गोळीबार करणा-याचे नाव असून सोमदत्त व एच. के. सिंह या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे हीघटना घडली असून गोळीबारामागचे नेमके कारण मात्र अद्याप समजलेले नाही. 
याप्रकरणी पोलिसांनी यादव याला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Firing in the air base in Mumbai, 2 killed