शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्थडे’साठी गेले अन् गायब झाले, अग्निशमन दल मगरींना घाबरले, मोबाइलच्या प्रकाशात मुलाकडून शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:31 IST

बर्थडे पार्टीसाठी ५२ वर्षीय संभाजी धोंडू कुळे यांनी मित्रांसोबत पहिल्यांदाच विहार तलाव गाठले. पार्टी सुरू असतानाच, पोहण्यासाठी जातो, असे सांगून ते पुढे गेले आणि दिसेनासे झाले.

मुंबई : बर्थडे पार्टीसाठी ५२ वर्षीय संभाजी धोंडू कुळे यांनी मित्रांसोबत पहिल्यांदाच विहार तलाव गाठले. पार्टी सुरू असतानाच, पोहण्यासाठी जातो, असे सांगून ते पुढे गेले आणि दिसेनासे झाले. घटनेची वर्दी लागताच पोलीस, अग्निशमन दल यांनी घटनास्थळ गाठले. मात्र तलावापर्यंत बोटी पोहोचत नाही, त्यात तलावात मगर असल्याचे सांगून ते पाण्यात उतरले नाहीत. त्यामुळे मुलानेच मित्रांच्या मदतीने वडिलांचा शोध सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत पाहावयास मिळाला.पवईच्या फिल्टरपाडा परिसरात संभाजी हे पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. ते पार्ले कंपनीत नोकरीला आहेत. रविवारी त्यांचा वाढदिवस होता. बर्थडे पार्टी म्हणून त्यांनी सकाळी मित्रांसोबत विहार तलाव गाठले. पार्टी उरकल्यानंतर त्यांनी मित्रांकडे तलावात पोहण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते पुढे निघाले. काही अंतरानंतर ते दिसेनासे झाले. बराच वेळ झाला तरी ते न परतल्याने मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. ते पाण्यात बुडाले या शक्यतेतून मित्रांनी पोलिसांना कळविले. घटनेची वर्दी लागताच पोलीस तेथे दाखल झाले. सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांकडून माहिती मिळताच, मुलांनी थेट विहार तलाव गाठले.मुलगा सनी याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला त्यांनी मुलुंडच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र हद्द मरोळ अग्निशमन विभागाची येते, असे सांगून ते निघून गेले. काही वेळाने पोलीसही निघून गेले.सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मरोळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. ते साडेअकराच्या सुमारास तलावाकडे आले. मात्र, बोटी पुढे आणल्या नाहीत. बोटी आणण्यासाठी दुसरा मार्ग दाखवूनही बोटी पुढे येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाण्यात उतरून वडिलांचा शोध घेण्याची त्यांना विनंती केली असता, पाण्यात मगर असतात, धोका कोण पत्करणार, असे सांगत त्यांनी पाण्यात न उतरता बघ्यांच्या गर्दीत उभे राहणे पसंत केल्याचा आरोप सनी याने केला आहे.सायंकाळच्या सुमारास तेही निघून गेले. अखेर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा सोडून आम्हीच बॅटरी, मोबाइलच्या प्रकाशात वडिलांचा शोध घेत आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने पालिका बोटींची व्यवस्था केली आहे. त्याच्यावरून शोध सुरू असल्याचे सनीने सांगितले. या प्रकरणी मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.कामावर जातो सांगून बाहेर पडले..त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास कामावर जातो, असे सांगून घर सोडले. आम्ही त्यांना तलावावर जाण्यास विरोध केला असता, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले नसावे, असे त्यांचा मुलगा सनी याने सांगितलेशोध सुरू : या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्याकडे विचारणा केली असता, आमच्याकडून शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या