शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर येथील महापारेषणच्या हाय व्होल्टेज सबस्टेशनला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 21:05 IST

सबस्टेशन मध्ये येणारा अतिदाबाचा करंट नियंत्रित करण्याचे काम रिअॅक्टर द्वारे करण्यात येते .

- गणेश आहेर लोणी ( जि. अहमदनगर):  संपुर्ण राज्याची विज नियंत्रण करणाऱ्या बाभळेश्वर नजीक असलेल्या निर्मल पिंपरी येथील चारशे केव्ही सबस्टेशन मधील रिअॅक्टरला आग लागुन तो जळून ख़ाक झाला. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे दोन किलोमीटर अंतरावर धुराचे लोट पसरल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सात अग्निशामक बंब आगीवर नियंत्रण मिळवविण्यासाठी अर्धा तासापासून प्रयत्नशील आहेत. मात्र, एकापाठोपाठ  एक अशा स्फोटांमुळे मोठी भीती पसरली आहे.

 सबस्टेशन मध्ये येणारा अतिदाबाचा करंट नियंत्रित करण्याचे काम रिअॅक्टर द्वारे करण्यात येते . येथील रिअॅक्टरला नेमकी आग कशामुळे लागली हे गुलदस्त्यात असले तरी अर्थींग व्यवस्थित न मिळाल्याने गरम होवून फुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

आगीत खाक झालेल्या या रिअॅक्टरमध्ये पन्नास हज़ार लिटर ऑईल साठवण्याची क्षमता असल्याने राज्य विज मंडळाचे मोठे नुक़सान झाले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आगीबाबत बाभळेश्वर येथील सबस्टेशन मधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही .आजच्या या आगीत रिअँक्टर जळून ख़ाक झाला असला तरी पर्यायी व्यवस्था असल्याने वीज वितरणावर फारसा परिणाम झाला नाही .

टॅग्स :fireआगmahavitaranमहावितरण