शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

रस्तेवाढीचा मार्ग सापडेना! जिल्हा अन् ग्रामीण रस्त्यांची लांबी ‘जैसे थे’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:09 AM

रस्ते बांधण्याची मोठमोठी आकडेवारी सरकारकडून दिली जात असताना आज प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात जिल्हा व ग्रामीण रस्त्यांची लांबी गेल्या तीन वर्षांत वाढलीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मुंबई  - रस्ते बांधण्याची मोठमोठी आकडेवारी सरकारकडून दिली जात असताना आज प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात जिल्हा व ग्रामीण रस्त्यांची लांबी गेल्या तीन वर्षांत वाढलीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.२०१४-१५ मध्ये प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ५०५८५ किलोमीटर होती. २०१५-१६ मध्ये ती केवळ २५९ किलोमीटरने वाढून ५०८४४ किमी इतकी झाली. २०१६-१७ मध्ये ५२६३७ किमी इतका आहे. इतर जिल्हा रस्त्यांची आकडेवारी अशी : २०१४-१५ - ५८११५ किमी, २०१५-१६ - ५८११६ किमी आणि २०१६-१७ - ५८११६ किमी.ग्रामीण रस्त्यांमध्येही वाढ होऊ शकली नाही. २०१४-१५ मध्ये १४५८७९ किमी, २०१५-१६ मध्ये १४५८८१ किमी तर २०१६-१७ मध्ये ग्रामीण रस्त्यांची लांबी १४५८८१ किमी इतकी होती.राष्ट्रीय महामार्गाचे प्रमाण मात्र वाढले. २०१४-१५ मध्ये राज्यात ४७६६ किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते. २०१५-१६ मध्ये हा आकडा ७४३८ किमीवर गेला तर २०१६-१७ मध्ये हा आकडा १२२७५ किमीवर गेला. त्याचवेळी २०१४-१५ मध्ये ६१६३ किमीचे प्रमुख राज्य महामार्ग होते. ते २०१५-१६ मध्ये ५१८० किमी झाले तर २०१६-१७ मध्ये े ३८६१ किमी इतके झाले. प्रमुख राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने हा आकडा कमीकमी होत गेल्याची शक्यता आहे.रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मार्च २०१७ पर्यंत ८६३४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये डिसेंबरपर्यंत १६१४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात आला आणि त्यावर २ हजार २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले.गेल्या ५३ वर्षांत राज्याने रस्तेबांधणीत विक्रमी काम केले. १९६५-६६मध्ये राज्यातील एकूण रस्त्यांची लांबी केवळ ५१७८८ किमी होती. २०१६-१७ मध्ये ती ३ लाख ३ हजार ३५९ किमी इतकी झाली. १७ हजार ५२४ किमीचे ग्रामीण रस्ते १ लाख ४५ हजार ८८१ किमीवर गेले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र