शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एसटी कर्मचारी आझाद मैदानातून बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:37 IST

विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  गेल्या काही दिवसात कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या मुंबईत वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सायंकाळी पाचनंतर मैदान सोडण्याचा सूचना मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या सूचनेचा मान ठेवत संपकरी कर्मचारी आझाद मैदानातून बाहेर पडले आहेत. पण उद्या पुन्हा हे कामगार आंदोलन करणार आहेत.

विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहाटे ५ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देण्यात आलेली आहे; मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान राज्यभरातून आणि खेड्यापाड्यातून कर्मचारी आले असल्याने रात्री त्यांना आझाद मैदानावर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. पण कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्य सरकारने रात्री जमावबंदीही लागू केलेली आहे. त्यानुसार मुंबईतील आझाद मैदानमधील आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना मैदानातून सायंकाळनंतर बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :ST Strikeएसटी संप