शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 11:43 IST

मुंबईतील पावसाची स्थिती आणि त्यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबईसह राज्याच्या काही भागांत जबर पाऊस सुरू आहे. मुंबई शहरासह उपनगरातही दमदार पाऊस होत आहे. याच बरोबर, पुढील चार दिवस राज्यासाठी मुसळधार पावसाचे असणार असून मुंबई आणि कोकणासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच, मुंबईतील पावसाची स्थिती आणि त्यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे.    

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट रीट्विट करत, "अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला...," असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे. भातखळकर यांनी रीट्विट केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाचा आणि त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेताना दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांचे ट्विट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, बीएमसीच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाची परिस्थिती, तसेच यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी, मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मुंबईतील पावसाची सद्यस्थिती आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना यांची सविस्तर माहिती दिली, असे म्हटले होते.

दुपारी मोठी भरती येण्याचा अंदाज -  मुंबईच्या समुद्रात दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी मोठी भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात ३.२७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे दुपारपर्यंत पाऊस कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबईRainपाऊस