शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अखेर २ महिन्यांनी मंत्र्यांना पीए, पीएस मिळाले; मुख्यमंत्र्यांनी मनमानीला लावला चाप

By यदू जोशी | Updated: February 12, 2025 07:40 IST

आपल्याला पीए, पीएस मिळत नसल्याने कामच करता येत नाही असे म्हणत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी आपापल्या मर्जीतील नावे रेटली, पण त्यातील अनेक नावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कात्री लावली आहे

यदु जोशीमुंबई - मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास दोन महिन्यांनी बहुतेक मंत्र्यांना पीए, पीएस, ओएसडी मिळाले आहेत, पण बरेच मंत्री असे आहेत की, ज्यांनी शिफारस केलेली नावे पूर्णपणे मंजूर न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमानीला चाप लावला. 

११ कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांकडील स्टाफला मंजुरी देणारा आदेश मंगळवारी काढण्यात आला. त्याआधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, ‘आपल्या मंत्रिकार्यालयाला स्टाफच नाही’ अशी ओरड विशेषत: शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी केली. याआधी पाच वेगवेगळे आदेश काढून पीए, पीएस, ओएसडी नेमण्यात आले होते. 

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडे असलेल्यांना घ्यायचे नाही, ज्यांचे रेकॉर्ड चांगला नाही, त्यांना घ्यायचे नाही अशा काही चाळण्या लावण्यात आल्या होत्या. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी चंद्रशेखर वझे यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्र्यांकडून शिफारस झालेल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, या आधी काही घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव आलेले होते का याची गुप्त माहिती घेण्यात आली.  आपल्याला पीए, पीएस मिळत नसल्याने कामच करता येत नाही असे म्हणत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी आपापल्या मर्जीतील नावे रेटली, पण त्यातील अनेक नावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कात्री लावली आहे. अजूनही चार ते पाच मंत्र्यांना पूर्ण स्टाफ मिळालेला नाही. 

भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने आपल्या मर्जीतील पीएस हवाच असा हट्ट धरला, हे मंत्री खरेतर फडणवीसांच्या अगदी जवळचे पण त्यांचा हट्ट पुरविला गेला नाही. अन्य एक ज्येष्ठ मंत्री आपल्या मर्जीतील नावासाठी अडून बसले, मग त्यांनी सुचविलेल्या नावाबाबत खातरजमा करण्यात आली आणि मग मंजुरी दिली गेली. भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यांच्या आधीच्या पीएसबाबत त्यांनी, गेल्या कार्यकाळात रा. स्व. संघाकडून आलेली कामे केली नाहीत, अशा तक्रारी करून त्यांचा पत्ता कापण्यात आला. 

मुख्यमंत्री कार्यालयाच्या चौकशीनंतर नियुक्तीचा निर्णयगेल्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांचे पीएस असलेले मंगेश शिंदे हे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे पीएस झाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप होत असताना प्रशांत भामरे हे पूर्वीप्रमाणेच त्यांचे पीएस झाले आहेत. त्यांच्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने बरीच चौकशी केल्यानंतर नियुक्तीचा निर्णय घेतला, अशी माहिती आहे. २०१४ मध्ये पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांचे पीएस राहिलेले मंदार वैद्य परतले आहेत. सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी संतोष पाटील हे माणिकराव कोकाटे यांचे पीएस असतील. जयराज कारभारी हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नवे पीएस असतील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस