शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

...अखेर मानवी हक्क आयोगाला मिळाला १४ महिन्यांनंतर विशेष महानिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:19 IST

वायरलेसमध्ये कार्यरत अब्दुर रेहमान यांची बढतीवर नियुक्ती

मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य मानवी हक्क आयोगामध्ये, अखेर १४ महिन्यांनंतर विशेष महानिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिनतारी संदेश यंत्रणेचे उपमहानिरीक्षक अब्दुर रेहमान यांची बढतीवर या पदावर सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल होणाºया तक्रारींचा तपास विभागाचे प्रमुखपद हे महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला तत्कालीन अधिकारी केशव पाटील निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. वास्तविक, पोलीस वर्तुळात या पदाला साइडची पोस्ट समजली जाते. अब्दुर रेहमान हे १९९७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेली बरीच वर्षे पुणे वायरलेसमध्ये ते कार्यरत होते.

बदली झालेल्या अन्य अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे) :उपायुक्त/अधीक्षक (भापोसे) : पंकज देशमुख (सातारा-पुणे शहर), हरिश बैजल (गोंदिया - एसआरपीएफ गट क्रमांक ६, धुळे), विनिता साहू (भंडारा - गोंदिया), दत्ता शिंदे (जळगाव - महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मुंबई), अरविंद साळवे (महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी - भंडारा),जयंत मीना (अमरावती ग्रामीण - बारामती), तेजस्वी सातपुते (पुणे शहर - सातारा), ईश सिंधू (महाराष्ट्र सदन, दिल्ली-अहमदनगर) तसेच रंजनकुमार शर्मा (अहमदनगर - सीआयडी नागपूर).

अप्पर अधीक्षक (मपोसे) : सुनील कडासने (गुप्तवार्ता विभाग, नाशिक - एसीबी, नाशिक), संदीप पखाले (बारामती - बीड), वैभव कलबुर्मे (बीड -चंद्रपूर), हेमराज राजपूत (चंद्रपूर - खामगाव), श्याम घुगे (खामगाव - अमरावती ग्रामीण), सचिन गोरे (एसआरपीएफ, धुळे - चाळीसगाव), प्रशांत बच्छाव (चाळीसगाव - प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे).

उपअधीक्षक : प्रशांत अमृतकर (कोल्हापूर शहर - करवीर उपविभाग), प्रेरणा कट्टे (करवीर - कोल्हापूर शहर), उत्तम कडलग (नाशिक ग्रामीण - चाळीसगाव), रिना यादवरावजी (नागपूर ग्रामीण - भंडारा), विशाल नेहुल (अष्टी बीड, बदली आदेशाधीन - औरंगाबाद ग्रामीण), सुदर्शन मुंडे (कर्जत, अहमदनगर - सिल्लोड, औरंगाबाद).‘ते’ अधिकारी साइडलानिवडणूक आयोगाने बदल्यांसाठी कार्यकाळाबरोबर गुन्हे दाखल असलेल्या, खातेनिहाय चौकशी असणाºया अधिकाºयांना कार्यकारी पदावरून साइड पोस्टिंग देण्याची सूचना केली. त्यानुसार, सोमवारी बदल्या केलेल्या काही अधीक्षकांची खात्यांतर्गत, प्राथमिक चौकशी सुरू असल्याने त्यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाही त्यांना हटविण्यात आले.