शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम आठवडा प्रस्तावावरून विधानसभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:21 IST

भाजपा नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरुन विधानसभेत फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

ठळक मुद्दे भाजपा नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरुन विधानसभेत फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. अंतिम आठवडा प्रस्तावाचा अधिकार विरोधकांचा असल्याचं सांगतं एकनाथ खडसे यांनी नियमावर बोट ठेवून सरकारची कोंडी केली.

मुंबई, दि. 10- भाजपा नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरुन विधानसभेत फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. अंतिम आठवडा प्रस्तावाचा अधिकार विरोधकांचा असल्याचं सांगतं एकनाथ खडसे यांनी नियमावर बोट ठेवून सरकारची कोंडी केली. तर सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

अंतिम आठवडा प्रस्ताव ठरवण्याचा अधिकार हा विरोधकांचा आहे. जर विषय जास्त असतील तर अध्यक्ष विरोधकांना विषय कमी करण्याची विनंती करतील, पण अंतिम आठवडा प्रस्तावातील बदल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी संगनमतानं करायचे असतात, असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. खडसेंनी त्यांच्या या वक्तव्याने सरकारला घरचा आहेर दिला आहे. एकनाथ खडसेंच्या विधानाचं विरोधकांनी स्वागत केलं. सरकारनं आमचा आवाज बंद केला आहे. कोणते मुद्दे चर्चेला घ्यावे हे आम्ही ठरवणार, तसंच सरकार मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

'सर्व भ्रष्ट मंत्री तसंच प्रकाश मेहता यांची चौकशी व्हावी. विश्वास पाटील यांची चौकशी कधी होणार? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात विचारला. या नेत्यांची चौकशी निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली व्हावी. तसंच राधेश्याम मोपलवार आणि मेहता यांची चौकशी निष्पक्ष व्हावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मोपलवर आणि मेहता प्रकरणी त्यांनाच विचारून चौकशी लावली जात आहे, अशी माहिती समजली असून मुख्यमंत्री त्यांना क्लीन चिट देतात, याला आमचा विरोध आहे. विशेष म्हणजे असे विषय अंतिम आठवडा प्रास्तावातून वगळले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.