शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरतीला अखेर मुहूर्त; ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 06:43 IST

ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसूल विभागातील तलाठी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, ४,६४४ जागांसाठीची जाहिरात महसूल व वन विभागाने प्रकाशित केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार असून, त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ पर्यंत आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी हा htpp://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर नंतर जाहीर केला जाणार असून, उमेदवारांना तो प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

ऑनलाइन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संगणकावर होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत.

यापूर्वी सरकारने वारंवार तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. तलाठी भरती रखडल्याने भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष होता, तर दुसरीकडे तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संबंधित कामांचा खोळंबा होत होता.

अनेक रोजगारअनेक महिन्यांपासून आम्ही मंत्रालय स्तरावर तलाठी भरतीसाठी पाठपुरावा करीत होतो. त्याला आज यश आले असून, उमेदवारांची तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली आहे. या माध्यमातून अनेक उमेदवारांना रोजगार मिळणार आहे.     - महेश घरबुडे,     स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र