शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

सैन्यभरतीचा पेपर फुटला; १८ अटकेत

By admin | Updated: February 27, 2017 05:47 IST

सैन्यभरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची चार ते पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला

ठाणे/ पुणे/ नागपूर/ पणजी : सैन्यभरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची चार ते पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पुणे, नागपूर आणि गोवा येथे छापा टाकून १८ जणांना अटक करण्यात आली असून, ३५० उमेदवारांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.यातून सुमारे १७ कोटी ५० लाखांचा घोटाळा उघड होण्याची तसेच रॅकेटमध्ये सैन्य दलातील बडे अधिकारी सहभागी असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सैन्य दलातील तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन आणि लिपिकासह चार वेगवेगळ्या पदांसाठी रविवारी देशभरात विविध केंद्रांवर लेखी परीक्षा होणार होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी तसेच ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे, तेथील निवासी प्रमाणपत्र मिळवून देणारे दलाल ठाण्यातील काही परीक्षार्थ्यांना भेटले होते. त्यासाठी एका उमेदवाराकडून त्यांनी ४ ते ५ लाख रुपये घेतल्याची खबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१च्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपआयुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी चार पथके नेमली. या पथकांनी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी पहाटे ४ या कालावधित पुण्याच्या फुरसुंगी, नागपूरच्या निर्मलनगर आणि गोव्यातील वाघाटोर बीच अशा तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान प्रश्नपत्रिका फोडून तिची विक्री करणाऱ्या १८ जणांना अटक करण्यात आली असून ३५० उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे. १८ आरोपींमध्ये सैन्यातील एका निवृत्त अधिकाऱ्यासह निमलष्करी दलातील एका निवृत्त अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ही माहिती सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने नागपूर येथील छाप्यात १० मोबाइल आणि दोन वाहने जप्त केली आहेत. पुण्यातील छाप्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने ११ मोबाइल आणि काही प्रश्नपत्रिका हस्तगत केल्या आहेत, तर गोवा येथील छाप्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने तीन मोबाइल, ५७ हजारांची रोकड आणि दोन प्रश्नपत्रिका हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुण्यात ९ जण ताब्यातठाणे पोलिसांनी पुणे गुन्हे शाखेच्या मदतीने हडपसर येथील भेकराईनगरमधील एका हॉलवर छापा टाकून ९ जणांना अटक केली तर, ७९ उमेदवारांना ताब्यात घेतले. या उमेदवारांना ३ लाख रुपयांच्या बदल्यात प्रश्नपत्रिका देण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेला धनाजी जाधव (रा. फलटण) सैन्य भरतीसाठी क्लासेस घेतो. जाधववर यापूर्वीही सैन्य दलातील भरती घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)>राज्यातील परीक्षा ठरविली रद्दमहाराष्ट्रातील कामटी, नागपूर, अहमदनगर आणि खडकी तसेच गोवा केंद्रावर रविवारी झालेली सैन्यभरती परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सैन्यभरती मंडळाने नवी दिल्लीत जाहीर केले. सोल्जर क्लार्क, स्ट्राँगमेन आणि सोल्जर ट्रेड््समन या पदांसाठी देशभरातील ५२ केंद्रांवर ही परीक्षा व्हायची होती. लष्करानेही या घटनेची चौकशी सुरू केली असून, चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.>असे चालायचे रॅकेट...सैन्य दलाच्या परीक्षेस बसलेल्यांना या टोळीतील काही दलाल हेरायचे. ठाण्याच्या परीक्षार्थ्याला पुणे किंवा नागपूर येथील केंद्रावर परीक्षा द्यायची असेल, तर तेथील रहिवासी दाखलाही ते मिळवून द्यायचे. या दाखल्यासह प्रश्नपत्रिका ४ ते ५ लाख रुपयांना देण्याचा सौदा निश्चित व्हायचा. वेगवेगळ्या केंद्रांवरील या परीक्षार्थ्यांना अज्ञातस्थळी ठेवून तिथे व्हॉट्सअ‍ॅपवर ही प्रश्नपत्रिका पाठवली जायची. त्या परीक्षा केंद्रासाठी असलेला टोळीप्रमुख मग त्या प्रश्नपत्रिकेचे प्रिंटआउट काढून विक्री करीत होता. >आरोपींकडून सर्व प्रश्नपत्रिका ताब्यात घेण्यात आल्या. फोडलेली प्रश्नपत्रिका आणि रविवारी देशभरातील परीक्षा केंद्रांवर वितरित झालेली प्रश्नपत्रिका एकच असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.