शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा’; आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 05:52 IST

रुग्णालयात गैरहजर राहणाऱ्या बंधपत्रित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री  प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिले. आरोग्य विभागाच्या प्रतीक्षा यादीवरील एमबीबीएस उमेदवारांना तातडीने नियुक्ती देऊन, मार्च अगोदर डॉक्टरांची नवीन भरती प्रकिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

रायगड जिल्ह्यातील आरोग्यविषयक बाबींचा आढावा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर  आदी  उपस्थित होते. रुग्णालयात गैरहजर राहणाऱ्या बंधपत्रित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. रुग्णालयांत डॉक्टर हजर राहावेत, अशी ताकीद डॉक्टरांना देण्यात  आली आहे.

पुन्हा सेवेची संधी  आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ यांना परत सेवेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी नियमात बदल करण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यांनी दिल्या.  रोजगार हमी मंत्री गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील वाढते औद्योगीकिकरण व मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात यामुळे ट्रामा केअर सेंटर वाढवण्याची, दोन डायलेसिस सेंटर वाढवण्याची, तसेच डॉक्टरांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली.

रुग्णालयांना, वैद्यकीय संस्थांना देणार भेटीआरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन रुग्णालयांतील स्वच्छता, सुरक्षा, परिसर स्वच्छता, रुग्णांच्या आहाराचा दर्जा, रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना मिळणारी वागणूक, औषधांची उपलब्धता, बाह्य संस्थेद्वारे नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन, तेथील सोयी-सुविधा, गैरसोयी आदी बाबींची पाहणी करावी, असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले. तसेच आरोग्य मंत्री स्वतः ही वैद्यकीय संस्थांना अचानक भेटी देणार आहेत. 

टॅग्स :Prakash abitkarप्रकाश आबिटकरHealthआरोग्य