शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

"टिपू सुलतानचा चौथरा उभारणाऱ्या फारुक शहांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 17:25 IST

सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Tipu Sultan Memorial Issue: राज्यात सर्वत्र शांततेचे वातावरण असतांना धुळ्याचे आ. फारूक शहा यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी  टिपू सुलतान यांचा चौथरा उभारल्याने तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्याची काम केले असून  त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे धुळे पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

आ. फारुक शहा यांनी शासकीय निधीचा दुरोपयोग करून टिपू सुलतानचे  स्मारक विनापरवानगी उभारून  शासकीय यंत्रणा पायदळी तुडवून सकल हिंदू समाजाला डिवचण्याचे काम या आमदाराने केले आहे. धुळे शहरात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावी हाच त्यामागचा उद्देश असल्याने त्याच्यावर देशद्रोहाची कारवाई व्हावी अन्यथा सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा निवेदनात  देण्यात आला आहे.

६ जून २०२३ रोजी  धुळे शहरातील शंभर फुटी रोडावरील वडजई चौकात मुस्लीम वस्तीत शासनाची कुठलीही परवानगी न घेता आ. फारुख शाह यांनी विनापरवानगी चौथरा बांधून त्याचे टिपू सुलतान चौक असे नामकरण केले. सदर बांधकाम निष्काशित करून त्यांच्यावर  गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्यमंत्री, गृह मंत्री तसेच पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त (धुळे) यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने  संबंधित ठेकेदार यांचेकडुन  तो चौथरा निष्कासित केला. त्यानंतर काही  समाजकंटकांकडून सोशल मिडीया अकाऊंटवर तक्रारदारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. स्वातंत्र्यवीर  सावरकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुध्द आपत्तीजनक  लिखाण करण्यात आले. त्यामुळे धर्मवंश व भाषा आदी कारणांवरून  शत्रुत्व वाढविण्याचे काम तसेच धार्मिक भावना व धर्माचा हेतुपुरस्पर अवमान करुन सार्वजनिक शांततेविरुध्द खोटी विधान व अफवा प्रसारीत करण्यात येत आहेत. तसेच मनपाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिपत्याखाली असलेल्या जागेवर विनापरवाना चौथऱ्याचे बांधकाम करुन सार्वजनिक शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केले आहे.

तक्रारीचा राग मनात धरुन नासीर खान, आरीफ मिरचीवाले, शाकीब शेख, सरफराज शेख, शेख हाजुसाब, मुस्तकीन शेख, अनिस शेख, अब्दुल सरकार, अबु सुफियान यांनी चौथरा निष्काषित झाल्याने विचलित होऊन  मुस्लीम समाजातील लोकांकडुन सोशल मिडीया अकाउंटवर हिंदू बांधवांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. त्यामुळे आ. फारुख शहा व अन्य लोकांविरुध्द गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सदर चौथरा काढला. मात्र ज्यांनी चौथरा बांधला. ज्यांनी शासकीय निधी वापरला. अशा कामास प्रशासनाने मात्र त्यांना पाठीशी घातले. त्यांच्यावर मात्र गुन्हा देखील दाखल केला गेला नाही. त्यामुळे समाजात नाराजीचा सूर बघण्यास मिळतो आहे. याबाबात सोमवारी सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत गुन्हा नोंद करणार का? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :MLAआमदारDhuleधुळे