सोलापूर : सोलापूरचे तत्कालीन हेकेखोर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे आणि राज्यशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ मुंडेंना पाठिशी घालणारे मुख्यमंत्रीही त्याला जबाबदार आहेत़ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आचेगाव येथे बोलताना दिली़ जयहिंद कारखाना येथे आलेले विखे-पाटील यांनी दुष्काळग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले. जिल्हाधिकारी मुंडे यांना राजाश्रय मिळाला़ मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत होते़ त्यांनी चुकीची धोरणे राबवली़ भीमा नदीकाठचा शेतकरी या धोरणाने उद्वस्थ झाला़ पिके जळाली़ चुकीची माहिती दिल्याने छावण्या उघडल्या नाहीत़ यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले़ सोलापूरच्या जनतेने मानवनिर्मित दुष्काळ अनुभवला़ शेतकऱ्यांच्या नुकसानीला मुंडे आणि शासन जबाबदार आहे़ (प्रतिनिधी)
सरकार विरोधात जनहित याचिका दाखल करणार
By admin | Updated: May 23, 2016 04:58 IST