शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कमी किंमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 15:56 IST

मागच्या तीन महिन्यांपासून  कापूस, सोयाबीन आणि कांदा दराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हैराण असून अनेक शेतकऱ्यांना साठवेलला माल कसा विकायचा असा प्रश्न पडला आहे.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कापसाला MSP पेक्षा कमी दर दिला जातोय अशी तक्रार शेतकऱ्यांनी मांडली होती. त्यावर आता राज्य सरकारनं कडक पाऊले उचलण्याचं ठरवलं आहे. कमी किंमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेशच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. त्यात कमी पैशात कापूस खरेदी करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असून या लोकांवर गुन्हे दाखल करून कापूस खरेदीवर चाप बसवला जाणार आहे. MSP पेक्षा कमी दरात कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत दिले. सरकारचा हा निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. जर यापुढे कुणी कमी दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असेल तर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. 

मागच्या तीन महिन्यांपासून  कापूस, सोयाबीन आणि कांदा दराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हैराण असून अनेक शेतकऱ्यांना साठवेलला माल कसा विकायचा असा प्रश्न पडला आहे. दर वाढतील या अपेक्षेने मराठवाडा  आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीचा कापूस साठवून ठेवला आहे पण दराने त्यांची निराशा केली. कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर केला आहे पण आज एकाही बाजार समितीमध्ये तेवढा दर मिळाला नाही. आज पणन मंडळाच्या अधिकृत  माहितीनुसार  एच-४-मध्यम स्टेपल, हायब्रीड, लोकल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती.  त्यामध्ये देऊळगाव राजा, मनवत आणि सेलू तालुक्यातील सिंदी येथे मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक झाली होती.  तर इतर बाजार समित्यांमध्ये कापसाची  आवक घटलेली दिसून येत आहे.

२ दिवसांपूर्वी मनवत बाजार समितीमध्ये ६ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून किमान दर हा ६ हजार ५०० आणि कमाल दर हा ६ हजार ९३५ रूपये एवढा होता. हा सरासरी दर ३ फेब्रुवारी दिवसातील सर्वांत जास्त दर होता. तर नेर परसोपंत बाजार समितामध्ये दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर ५ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. हा कापसाचा दर या हंगामातील सर्वांत कमी दर असून हा दर हमीभावापेक्षा २ हजार २० रूपयांनी कमी होता. 

टॅग्स :cottonकापूसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस