शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पवार विरुद्ध पाटील लढत

By admin | Updated: June 14, 2015 03:08 IST

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) द्वैवार्षिक निवडणूकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एमसीए उमेदवारांची

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) द्वैवार्षिक निवडणूकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एमसीए उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली असून, यानुसार अध्यक्षपपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांच्यामध्ये थेट लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.शनिवारी एमसीए निवडणूकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवस होता. यावेळी पवार - म्हाडदळकर गटाच्या रवी सावंत आणि आमदार आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी दाखल केलेला आपआपला अर्ज मागे घेऊन विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे आता पवार यांच्यासमोर अपेक्षेप्रमाणे डॉ. विजय पाटील यांचे आव्हान असेल हे स्पष्ट झाले. एकूण १७ पदांसाठी होणाऱ्या या निवडणूकीमध्ये अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, दोन सह-सचिव पद, खजिनदार व ११ कार्यकारीणी सदस्यपदांसाठी निवडणूक रंगणार आहे. उपाध्यक्षपदासाठी पवार - म्हाडदळकर गटाकडून माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर आणि आमदार आशिष शेलार यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्यासमोर आव्हान असेल ते क्रिकेट फर्स्टच्या माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरविल्ला आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे. दरम्यान क्रिकेट फर्स्ट गटाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असल्याने यंदाच्या निवडणूकीत क्रिकेट फर्स्ट गटाच्या उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सह-सचिव पदाच्या दोन जागांसाठी देखील मोठी चुरस रंगणार असून क्रिकेट फर्स्ट गटातून डॉ. उन्मेश खानविलकर आणि माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी पवार - म्हाडदळकर गटाच्या रवी सावंत व डॉ. पी. व्ही. शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. तर खजिनदारपदासाठी नितीन दलाल (पवार - म्हाडदळकर) आणि मयांक खांडवाला (क्रिकेट फर्स्ट) यांच्यामध्ये मोठी चुरस असेल. विशेष म्हणजे एमसीए निवडणूकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपाध्यक्षपदासाठी भरलेला आपला अर्ज मागे घेतला असल्याने निवडणूकीच्या दिवशी त्यांचा पाठिंबा कोणाला असेल याबाबत आता उत्सुकता लागली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादीपवार - म्हडदाळकर : शरद पवार (अध्यक्षपद), दिलीप वेंगसरकर व आशिष शेलार (उपाध्यक्षपद), रवी सावंत व डॉ. पी. व्ही. शेट्टी (सह - सचिव पद), नितीन दलाल (खजिनदारपद), कार्यकारणी पदाचे उमेदवार : विनोद देशपांडे, दिपक मूरकर, पंकज ठाकूर, रमेश वाजगे, दीपक पाटील, अरविंद कदम, अरमान मलिक, श्रीकांत तिगडी, नवीन शेट्टी, गणेश अय्यर, शाह अलम.क्रिकेट फर्स्ट : डॉ. विजय पाटील (अध्यक्षपद), अ‍ॅबी कुरविल्ला व प्रताप सरनाईक (उपाध्यक्षपदासाठी), डॉ. उन्मेश खानविलकर व लालचंद राजपूत (सहसचिव पद), मयांक खांडवाला (खजिनदारपद), कार्यकारणी सदस्यपदासाठी : प्रवीण आमरे, जगदीश गावंडे, दीपक जाधव, संगम लाड, नदीम मेमन, दाऊद पटेल, संजय पाटील, राजेंद्र फातरपेकर, सुरज समत, इक्बाल शेख, राहूल शेवाळे.