शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

साडेआठ लाख लोकसंख्येच्या सुरक्षिततेसाठी ५० कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

सन १९८३ मध्ये महापालिका उदयास आली. तेव्हा लोकसंख्या पाच लाखांवर होती. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाची निर्मितीदेखील योग्य होती. परंतु, आजघडीला त्याच्या दुप्पट लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता येथील मनुष्यबळ व वाहनांची संख्या तोकडी आहे. एकाच वेळी शहराच्या दोन भागांत आग लागल्यास वाहन व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे ताजेच उदाहरण आहे.

ठळक मुद्दे१९ अग्निशमन वाहने : दोन आठवड्यापासून एक नादुरुस्त

अमरावती : महापालिकेचा दर्जा असलेल्या साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती महानगराच्या अग्निसुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची संख्या केवळ ५०, तर ४३ कंत्राटी आहेत. १९ वाहने आहेत. तीन पाळ्यांमध्ये या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावावे लागतात. अशातच वाहने चालू स्थितीत असल्या तरी त्या कधी नादुरुस्त होईल, याचे नेम नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत या विभागात मनुष्यबळासह वाहनांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.सन १९८३ मध्ये महापालिका उदयास आली. तेव्हा लोकसंख्या पाच लाखांवर होती. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाची निर्मितीदेखील योग्य होती. परंतु, आजघडीला त्याच्या दुप्पट लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता येथील मनुष्यबळ व वाहनांची संख्या तोकडी आहे. एकाच वेळी शहराच्या दोन भागांत आग लागल्यास वाहन व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे ताजेच उदाहरण आहे. एका नामांकित हॉटेलला आग लागण्यापूर्वी दुसरीकडे अग्निशम वाहनासह कर्मचारी गेल्यामुळे कंत्राटी वाहनचालकाला त्या हॉटेलमधील आग विझविण्यास पाठविले गेले नि अपघात घडला. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याच्या घटना अधिक घडण्याचे संकेत आहे.सध्या अग्निशमन विभागात चारही झोनमध्ये कर्मचारी संख्या आणि वाहन पुरेशी आहे. अग्निशमनच्या सर्व कर्मचाºयांच्या फिटनेस टेस्टसाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेले असून, त्यावर होकारसुद्धा मिळालेला आहे. ८ मार्चपासून ही चाचणी सुरू होऊ शकते.- नरेंद्र वानखडे,सहायक आयुक्त, महापालिकाचारही झोनमध्ये १९ वाहनेमहापालिकेच्या अग्निशमन विभागाचे शहरात चार झोन आहेत. मालविय चौकातील मुख्य कार्यालय, ट्रान्सपोर्टनगर, बडनेरा आणि एमआयडीसी येथे उपविभाग आहेत. यामध्ये एकूण १९ वाहने रेकॉर्डवर असल्या तरी एक वाहन दोन आठवड्यांपासून अपघातग्रस्त आहे. त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त अद्याप नाही. इतरही वाहने नादुरुस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका