साडेआठ लाख लोकसंख्येच्या सुरक्षिततेसाठी ५० कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:46+5:30

सन १९८३ मध्ये महापालिका उदयास आली. तेव्हा लोकसंख्या पाच लाखांवर होती. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाची निर्मितीदेखील योग्य होती. परंतु, आजघडीला त्याच्या दुप्पट लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता येथील मनुष्यबळ व वाहनांची संख्या तोकडी आहे. एकाच वेळी शहराच्या दोन भागांत आग लागल्यास वाहन व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे ताजेच उदाहरण आहे.

Fifty employees for the safety of 8.5 lakh population | साडेआठ लाख लोकसंख्येच्या सुरक्षिततेसाठी ५० कर्मचारी

साडेआठ लाख लोकसंख्येच्या सुरक्षिततेसाठी ५० कर्मचारी

Next
ठळक मुद्दे१९ अग्निशमन वाहने : दोन आठवड्यापासून एक नादुरुस्त

अमरावती : महापालिकेचा दर्जा असलेल्या साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती महानगराच्या अग्निसुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची संख्या केवळ ५०, तर ४३ कंत्राटी आहेत. १९ वाहने आहेत. तीन पाळ्यांमध्ये या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावावे लागतात. अशातच वाहने चालू स्थितीत असल्या तरी त्या कधी नादुरुस्त होईल, याचे नेम नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत या विभागात मनुष्यबळासह वाहनांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
सन १९८३ मध्ये महापालिका उदयास आली. तेव्हा लोकसंख्या पाच लाखांवर होती. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाची निर्मितीदेखील योग्य होती. परंतु, आजघडीला त्याच्या दुप्पट लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता येथील मनुष्यबळ व वाहनांची संख्या तोकडी आहे. एकाच वेळी शहराच्या दोन भागांत आग लागल्यास वाहन व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे ताजेच उदाहरण आहे. एका नामांकित हॉटेलला आग लागण्यापूर्वी दुसरीकडे अग्निशम वाहनासह कर्मचारी गेल्यामुळे कंत्राटी वाहनचालकाला त्या हॉटेलमधील आग विझविण्यास पाठविले गेले नि अपघात घडला. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याच्या घटना अधिक घडण्याचे संकेत आहे.

सध्या अग्निशमन विभागात चारही झोनमध्ये कर्मचारी संख्या आणि वाहन पुरेशी आहे. अग्निशमनच्या सर्व कर्मचाºयांच्या फिटनेस टेस्टसाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेले असून, त्यावर होकारसुद्धा मिळालेला आहे. ८ मार्चपासून ही चाचणी सुरू होऊ शकते.
- नरेंद्र वानखडे,
सहायक आयुक्त, महापालिका

चारही झोनमध्ये १९ वाहने
महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे शहरात चार झोन आहेत. मालविय चौकातील मुख्य कार्यालय, ट्रान्सपोर्टनगर, बडनेरा आणि एमआयडीसी येथे उपविभाग आहेत. यामध्ये एकूण १९ वाहने रेकॉर्डवर असल्या तरी एक वाहन दोन आठवड्यांपासून अपघातग्रस्त आहे. त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त अद्याप नाही. इतरही वाहने नादुरुस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Fifty employees for the safety of 8.5 lakh population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.